मंत्रिमंडळ बैठकीतून वर्षा गायकवाड, अस्लम शेख बाहेर पडले; कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 05:43 PM2022-06-29T17:43:12+5:302022-06-29T17:53:30+5:30
कालपर्यंत मंत्रिमंडळ बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला उपस्थित राहणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज स्वत: मर्सिडीज चालवत मंत्रिमंडळ बैठकीला गेले आहेत.
तीन शहरांच्या नामांतरावरून बोलविलेल्या ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात झाली आहे. मात्र, त्यावेळीच काँग्रेसचे मंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख बैठकीतून बाहेर पडले आहेत. याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कालच्या बैठकीत मंत्री अनिल परब यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर कारावे, उद्याच्या बैठकीत यावर ठराव संमत करावा अशी मागणी केली होती. याचबरोबत उस्मानाबादचे देखील नामांतर प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. या शहराचे नाव धाराशिव असे करण्याची मागणी आहे. ठाकरे सरकारवर बहुमत चाचणीची टांगती तलवार असताना २४ तासांत दुसरी मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली आहे.
कालपर्यंत मंत्रिमंडळ बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला उपस्थित राहणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज स्वत: मर्सिडीज चालवत मंत्रिमंडळ बैठकीला गेले आहेत. ते या बैठकीला उपस्थित असतील. दुसरीकडे राज्यपालांनी दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाला ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावर थोड्याच वेळात सुनावणी सुरु होणार आहे. अशावेळीच ठाकरे सरकारची मंत्रिमंडळ बैठक होत आहे. यामुळे कदाचित सर्वोच्च न्यायालय़ाचा निकाल पाहून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ही ठाकरे मंत्रिमंडळाची शेवटची बैठकही ठरू शकते.
मंत्रिमंडळ बैठकीसाठी वर्षा गायकवाड पुन्हा उपस्थित झाल्या. फाईल विसरल्याचे दिले कारण.