Maharashtra Politics : अनिल परब म्हणाले, तो नेपाळी, ठाकरे गालातल्या गालात हसले; सभागृहात नेमकं काय घडलं?

By संतोष कनमुसे | Updated: March 25, 2025 18:36 IST2025-03-25T18:33:31+5:302025-03-25T18:36:19+5:30

Maharashtra Politics : आज विधान परिषदेत आमदार अनिल परब यांनी मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता निशाणा साधला.

Maharashtra Politics Anil Parab said, he is Nepali, uddhav thackeray laughed What exactly happened in vidhan sabha? | Maharashtra Politics : अनिल परब म्हणाले, तो नेपाळी, ठाकरे गालातल्या गालात हसले; सभागृहात नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics : अनिल परब म्हणाले, तो नेपाळी, ठाकरे गालातल्या गालात हसले; सभागृहात नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics ( Marathi News ) : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच मंत्री नितेश राणे यांनी हलाल आणि झटका मासांवरुन राजकारण तापले होते. राणे यांनी 'मल्हार सर्टिफिकेशन' सुरु केले आहे. दरम्यान, यावरुन आज विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले. यावेळी सभागृहात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. आमदार अनिल परब यांचे भाषण ऐकून ठाकरेही गालातल्या गालात हसत असल्याचे पाहायला मिळाले. 

आज विधान परिषदेत संविधानावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना आमदार अनिल परब यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका केली. यावेळी बोलताना आमदार अनिल परब म्हणाले, भारताची घटना ही चार स्तंभावरती आहे. चारही स्तंभाचा आपला संबंध येतो. याद्वारेच आपण काम करत असतो. भारताची राज्यघटना मजबूत आहे. पण, शेवटच्या माणसापर्यंत ते पोहोचले आहे की नाही? याचे महत्व लोकांपर्यंत पोहोचले आहे का? आज आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करतो. कायदे नियम घटनेच्या आधारावर बनले आहेत, असंही अनिल परब म्हणाले. 

"माझा सगासोयरा अपराधी असेल, तरीही त्याला शिक्षा करेन, कारण....', CM फडणवीसांचं विधान

"घटनेमुळे मला बोलण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. माझ्या बोलण्यामुळे दुसऱ्याच्या अधिकारावर काही गदा येते का हे पाहणे माझे काम आहे. कोणही उटतंय आणि कोणावरही काहीही बोलतंय. मानाच्या स्थानावरील लोकांची विटंबना करत आहे. घटनेचा मुळ पाया हा समानतेचा आहे. मी काय खायचं, काय खायचं नाही हा अधिकार माझा आहे. हल्ली काय झालंय, मी मौसाहरी खायचं नाही. मी जर मौसाहरी असेल तर सोसायटीमध्ये घर मिळणार नाही. हा अधिकार कोणी दिला? हा अधिकार घटनेने दिला आहे का?, असा सवालही अनिल परब यांनी केला.

राणेंवर नाव न घेता टीका 

"मटण झटक्याचं खायचं की हलालचं खायचं हे कोण ठरवणार? मंत्री ठरवायला लागले. हा कायदा कोणी आणला? ज्या घटनेने मला राहण्याचा आणि खाण्याचा अधिकार दिला आहे.  मंत्री उठतात आणि सांगतात मल्हार असेल तरच खायचं नाहीतर खायचं नाही. म्हणजे तुम्ही दोन धर्मात फूट पाडत आहात. आम्ही हिंदू आहोत आम्हाला बाळासाहेबांनी जे कोण असतील मग ते हिंदू असतील किंवा मुस्लिम असेल जो कोणी देशाच्या विरोधात काम करत असेल तो आपला शत्रू आहे. त्या बॉम्ब ब्लॉस्टमध्ये मुस्लिम लोक आढळले म्हणून त्यावेळी बाळासाहेबांची वाक्ये होती. आज काय झालंय, माझ्या इकडे एका सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमन आहे. तो रात्रभर जागते रहो असं ओरडत असतो. म्हणून त्याला वाटतं आम्ही त्याच्यामुळे सुरक्षित आहोत. असाच एक नेपाळी महाराष्ट्रात फिरत आहे. त्यांना असं वाटतंय त्यांच्यामुळे हिंदू धर्म टीकलाय, अशी टीका मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता परब यांनी केली. हिंदू धर्म सांभाळायला आमच्यात तेवढी ताकद आहे, असा टोलाही अनिल परब यांनी लगावला. यावेळी परब यांच्या बाजूलाच ठाकरे बसले होते, ठाकरे यांना हसू आवरता आले नाही.

Web Title: Maharashtra Politics Anil Parab said, he is Nepali, uddhav thackeray laughed What exactly happened in vidhan sabha?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.