Maharashtra Politics : भाजप अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार! शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 13:11 IST2024-11-28T13:07:38+5:302024-11-28T13:11:06+5:30
Maharashtra Politics : महायुतीने राज्यात विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले.

Maharashtra Politics : भाजप अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार! शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार?
Maharashtra Politics ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. सत्ता स्थापनेसाठी आता राज्यात हालचालींना वेग आला आहे. आज मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच महायुतीमधील तिन्ही पक्षांचे नेते आज दिल्लीत जाणार आहेत. दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे.
मुख्यमंत्रिपदाचे आज नाव जाहीर होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या माघारीनंतर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, आज सायंकाळपर्यंत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रात नव्या मंत्रिमंडळाची स्थापना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
भाजप नवीन मंत्रिमंडळात अर्धी पदे आपल्या पक्षाकडे ठेवू शकते. तर नवीन सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला तीन मोठ्या खात्यांसह महाराष्ट्रातील १२ कॅबिनेट पदे मिळू शकतात,अशी चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिमंडळात नऊ जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ४३ मंत्री केले जाऊ शकतात. एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्रिमंडळात नगरविकास, सार्वजनिक बांधकाम खाते, जलसंपदा ही प्रमुख खाती मिळू शकतात, असं बोलले जात आहे.
तसेच उपमुख्यमंत्रिपदाबाबतही चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील नवा मुख्यमंत्री भाजपचा असू शकतो. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्रीही शपथ घेऊ शकतात. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावर आपला दावा नसल्याचे जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असल्याचे शिंदे यांनी सांगितले.