"काळेधंदे बाहेर काढल्याने मिरच्या लागल्या...";एकनाथ शिंदेंकडून नीलम गोऱ्हेंची पाठराखण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 09:39 IST2025-02-26T09:37:24+5:302025-02-26T09:39:33+5:30
Maharashtra Politics : दोन दिवसापूर्वी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले होते.

"काळेधंदे बाहेर काढल्याने मिरच्या लागल्या...";एकनाथ शिंदेंकडून नीलम गोऱ्हेंची पाठराखण
Maharashtra Politics ( Marathi News ) : काही दिवसापूर्वी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. संमेलनाच्या कार्यक्रमात बोलताना नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की पद मिळते ही वस्तुस्थिती आहे, असा आरोप गोऱ्हे यांनी केला. या आरोपावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. ठाकरे गटाकडून राज्यभरात गोऱ्हे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आता गोऱ्हे यांच्या समर्थनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहे, त्यांनी नीलम गोऱ्हे यांची पाठराखण केली आहे.
शिंदेंकडील गृहनिर्माण विभागाच्या कारभारावर CM देवेंद्र फडणवीसांची नाराजी; कारण काय?
काल मुंबईतील अंधेरी येथील बीएमसी मैदानात शिवसेनेने 'लाडक्या बहिणींची आभार सभा' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. एकनाथ शिंदे म्हणाले, परवा नीलम गोऱ्हे दिल्लीतील एका व्यासपीठावर बोलल्या. आता ते व्यासपीठ बरोबर होतं की चुकीचं होतं हा भाग वेगळा पण ते काही जणांना एवढं झोंबल की काही जणांना मिरच्या लागल्या, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर लगावला.
"आम्ही ज्यावेळी उठाव केला त्यावेळी हे आम्हाला रोज शिव्याशाप देत होते. आम्ही कधीही आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही, आम्ही कामातून उत्तर दिले आहे. म्हणून आमच सरकार यशस्वी ठरलं. पण, यांची ज्यावेळी खुर्ची गेली तेव्हापासून यांचं पोट दुखतंय. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं. देशाच्या पंतप्रधानांनी स्वप्न पूर्ण केलीत. ३७० कलम सुद्धा रद्द केला. तरीही त्यांच्यावर रोज आरोप करता, पण देशातील जनता पंतप्रधान मोदींच्या पाठिमागे आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
'आमची देना बँक आणि समोरच्यांची लेना बँक'
यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शिंदे म्हणाले, आमची देना बँक आहे आणि समोर लेना बँक आहे. नीलम गोऱ्हे या महिलांवर अत्याचार झाल्यास पहिल्या धावून जाणाऱ्या आहेत. शक्ती विधेयकामध्ये त्यांचं योगदान मोठं आहे. जे चांगलं काम करतात त्यांना बदनाम करण्याचं काम ही लोक करत आहेत, असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला.