Devendra Fadnavis: 'मला अडकवण्यासाठी नवीन पोलीस आयुक्त...'; मविआ सरकावर फडणवीसांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 12:32 PM2024-04-26T12:32:35+5:302024-04-26T12:39:22+5:30

Devendra Fadnavis : मविआच्या काळात भाजप नेत्यांना अटक करण्यात येणार होती या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आहे.

Maharashtra Politics Devendra Fadnavis serious accusation against Mahavikas Aghadi Government | Devendra Fadnavis: 'मला अडकवण्यासाठी नवीन पोलीस आयुक्त...'; मविआ सरकावर फडणवीसांचा गंभीर आरोप

Devendra Fadnavis: 'मला अडकवण्यासाठी नवीन पोलीस आयुक्त...'; मविआ सरकावर फडणवीसांचा गंभीर आरोप

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. अशातच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माढ्यात बोलताना मविआच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात टाकण्यात येणार होतं असा धक्कादायक दावा केला होता. या दाव्याला एका मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दुजोरा दिला. या सगळ्या प्रकरणावर आता देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आहे. मला अडवण्यासाठी पोलीस आयुक्तांना बसवलं होतं असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी टीव्ही9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत या सगळ्या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली.

महायुतीच्या काळात अनेक भाजपच्या नेत्यांना अटक करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचे आरोप आता करण्यात येत आहेत. त्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे विधान केलं. "महाविकास आघाडीने मला कोणत्यातरी प्रकरणात अडकवण्याचा खूप प्रयत्न केला. केसापासून नखापर्यंत माझी चौकशी केली पण त्यांना काहीच सापडलं नाही. खोट्या केसेस टाकण्यासाठी एक पोलीस आयुक्त आणून बसवला, पण इतर पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं नाही," असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

"ठाकरे गट अहवाल काही देऊ शकतो. अमेरिकेचा अध्यक्षही त्यांचा होऊ शकतो असा अहवालही ते देऊ शकतात. पण आता वास्तविकता वेहळी असून आता आमच्यासोबत मनसे देखील आली आहे. त्यामुळे मला काहीच अडचण वाटत नाही," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ठाकरे गटाच्या जाहीरनाम्यावरही फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. "उद्धव ठाकरेंनी आधी त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळावर श्वेतपत्रिका काढावी. अडीच वर्षात महाराष्ट्राची किती अधोगती झाली यासाठी त्यांनी माफी मागावी. मुंबईला फसवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केलं. २५ वर्ष मुंबई त्यांच्याकडे होती. एक काम ते मुंबईतील दाखवू शकत नाहीत. आमच्याकडे सरकार आल्यानंतर आम्ही मुंबईचा कायापालट केला," असंही फडणवीसांनी म्हटलं.
 

Web Title: Maharashtra Politics Devendra Fadnavis serious accusation against Mahavikas Aghadi Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.