मोठी बातमी! हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 10:41 IST2025-03-05T10:41:11+5:302025-03-05T10:41:40+5:30
मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली आहे.

मोठी बातमी! हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली
Maharashtra Politics ( Marathi News ) : काही दिवसापूर्वीच महायुती सरकारने मंत्र्यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती. मंत्री हसन मुश्रीफ यांना वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली आहे.
अखेर हकालपट्टी… राजीनामा देता की बडतर्फ करू? CM फडणवीसांनी दम देताच धनंजय मुंडेंचा राजीनामा
मंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूरचे आहेत. त्यांना त्यांच्या मतदारसंघात वेळ देता नाही म्हणून त्यांनी ही जबाबदारी सोडल्याचे सांगण्यात येत आहे. महायुतीमध्ये गेल्या काही दिवसापासून रायगड आणि नाशिकच्या पालमंत्रिपदावरुन तिढा सुरू आहे. हा तिढा सुटला नसताना आता वाशिमच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी हसन मुश्रीफ यांनी सोडली आहे, यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
याबाबत हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे. दुसरीकडे दत्ता भरणे यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्री पद नाही, यामुळे आता वाशिम जिल्ह्याची जबाबदारी भरणे यांच्याकडे जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
कालच राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तर दुसरीकडे दुसऱ्याच दिवशी हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.