Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 09:30 AM2024-09-23T09:30:48+5:302024-09-23T09:36:20+5:30
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना शिंदे गटात पक्षांतर्गत वाद असल्याचे दिसत आहे.
Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात अंतर्गत वाद असल्याचे दिसत आहे, काल एका कार्यक्रमात शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आमदार संजय शिरसाट यांच्याबाबत एक वक्तव्य केलं, यावरुन अंतर्गत वाद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
मंत्रिमंडळात स्थानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची महामंडळावर वर्णी लावण्यात आली आहे. संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे गटाचे संजय शिरसाट, भरत गोगावले आणि इतर काही नेते मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत होते. मंत्रिपदावरुन शिरसाट आणि गोगावले यांच्यात अंतर्गत वाद असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, काल एका कार्यक्रमात आमदार भरत गोगावले यांनी मोठं विधान केले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना आमदार गोगावले म्हणाले, ज्यावेळी मंत्रिपदाची वेळ आली. त्यावेळी एकजण म्हणाला मी राजीनामा देतो. त्यावेळी त्यांना समजावले, म्हणून साहेबांनी त्यांना आता सीडकोचे चेअरमनपद दिले आहे, असा टोला नाव न घेता गोगावले यांनी शिरसाट यांना लगावला.
गोगावले म्हणाले, " एसटी मंडळाचं अध्यक्षपद दिलं, हे मोठं पद आहे. त्या पदाला कॅबिनेटचा दर्जा आहे. सगळ्यांचं मत आहे जे मिळालं आहे ते घ्या. ताईंच्या मंत्रिपदात ढवळा ढवळ करु नका, असं मला सांगण्यात आलं आहे, असंही आमदार गोगावले म्हणाले. एसटी महामंडळाच्या पदाबाबत कार्यकर्त्यांशी बोलून चर्चा करणार आहे. त्यानंतरच आम्ही हे पद स्विकारायचं की नाही हे ठरवणार आहे, असंही गोगावले म्हणाले.