"एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाणार, राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार", संजय राऊतांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 03:54 PM2023-07-02T15:54:28+5:302023-07-02T16:01:05+5:30

''शपथविधीवेळी शिंदे गटाचे नेत्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते. आता कोणतीही पळवाट त्यांना वाचवू शकत नाही.''

Maharashtra Politics: "Maharashtra will get a new Chief Minister", Sanjay Raut's big claim | "एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाणार, राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार", संजय राऊतांचा दावा

"एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाणार, राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार", संजय राऊतांचा दावा

googlenewsNext

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह त्यांचे सर्व आमदार अपात्र ठरणार आणि राज्याला लवकरच नवीन मुख्यमंत्री मिळणार, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. आज राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घटली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपध घेतली. म्हणजेच आता राष्ट्रवादीदेखील सत्तेत सामील झाली आहे. यावरुन संजय राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले संजय राऊत?

यावेळी संजय राऊत म्हणाले, "मी याला भूकंप वैगरे मानत नाही. काही गोष्टी या राजकारणात घडणार होत्या, त्या आज घडल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की, जे सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार आहे, ते अस्थिर आहे. 165 आमदारांचा पाठींबा असल्याचा दावा ते करतात, पण त्यांना अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांची गरज लागते. याचा अर्थ मी असा काढतो की, सर्वोच्च न्यायालयाने शिंदेगटाबाबत निवाडा दिला आहे, घटनाबाह्य सरकार म्हटले आहे, ते योग्य आहे. "

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर राहणार नाहीत
"आजच्या शपथविधीचा अर्थ म्हणजे एकनाथ शिंदेंसह प्रथम 16 आणि नंतर सर्व आमदार अपात्र ठरणार आहेत. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाण्याची सुरुवात झाली आहे. यामुळेच भाजपने आता हे नवीन टेकू घेतलं आहे. कोणावर काय आरोप, काय खटले सुरू होते, यात मला पडायचे नाही. पण, यातले अनेक लोक असे आहेत, ज्यांच्याविरोधात भाजपने मोहिम राबवली होती. त्यांचे आता भाजप काय करणार, हा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे फारकाळ मुख्यमंत्रिपदावर राहत नाहीत, त्यांचे आमदारही अपात्र ठरतील, हे आजच्या शपथविधीवरुन स्पष्ट होते," अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

आम्ही पुन्हा जोमाने उभं राहू
ते पुढे म्हणाले की, "माझं शरद पवारांशी बोलणं झालं आहे, ते खंबीर आहेत. उद्धव ठाकरेंनीदेखील शरद पवारांशी चर्चा केली आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते, आम्ही पुन्हा उभं राहू. राज्यातल्या लोकांचा या सगळ्यांना अजिबात पाठींबा नाही. जे शिवसेनेच्या बाबतीत घडवलं गेलं, राष्ट्रवादीच्या बाबतीत घडवंल गेलं, त्याला जनता पाठींबा देणार नाही."

राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार
"गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता, हा विस्तार शिंदेंच्या वेळेस व्हायला हवा होता. पण, आज या शपथविधीवरुन वेगळाच अर्थ निघतोय. अजित पवारांसह इतर नेत्यांच्या शपथविधीवेळी शिंदे गटाचे नेत्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते. त्यांच्या वेदना मी समजू शकतो. पण, आता कोणतीही पळवाट त्यांना वाचवू शकत नाही. या राज्याला परत एक नवा मुख्यमंत्री मिळू शकतो," असा दावाही त्यांनी यावेळी केला.
 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: Maharashtra Politics: "Maharashtra will get a new Chief Minister", Sanjay Raut's big claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.