Maharashtra Politics: महाराष्ट्रात 'लव्ह जिहाद'ची 1 लाखांपेक्षा जास्त प्रकरणे; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 01:22 PM2023-03-09T13:22:26+5:302023-03-09T13:23:03+5:30

'राज्य शासनाने आंतरधर्मीय विवाहाबाबत स्थापन केलेल्या समितीच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम.'

Maharashtra Politics: Over 1 Lakh Cases of 'Love Jihad' in Maharashtra; Information from Minister Mangalprabhat Lodha | Maharashtra Politics: महाराष्ट्रात 'लव्ह जिहाद'ची 1 लाखांपेक्षा जास्त प्रकरणे; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

Maharashtra Politics: महाराष्ट्रात 'लव्ह जिहाद'ची 1 लाखांपेक्षा जास्त प्रकरणे; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

googlenewsNext


Maharashtra News :महाराष्ट्राच्याअर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी लव्ह जिहादबाबत धक्कादायक माहिती दिली. राज्यात लव्ह जिहादची 1 लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली असल्याचे लोढा यांनी सांगितले. याविरोधात राज्यातील नागरिकांनी अनेकदा हजारोंच्या संख्येने एकत्र येऊन निषेध नोंदवला आहे. दरम्यान, राज्यात अजून एक श्रद्धा वालकर होऊ नये, याची जबाबदारी राज्य सरकारची असून त्यासाठी आंतरधर्मीय विवाह समिती स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये महाराष्ट्र सरकारने आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांची माहिती गोळा करण्यासाठी एक समिती स्थापन केल्याची घोषणा केली होती. 13 डिसेंबर रोजी राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने जारी केलेल्या सरकारी ठराव (GR) मध्ये असे म्हटले आहे की, "आंतर-जातीय/आंतर-धर्मीय विवाह-कौटुंबिक समन्वय समिती (राज्य स्तर)" प्रामुख्याने विवाहांच्या संख्येवर डेटा टेबल करेल.

आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर अनेकदा मुलींना त्यांच्या माहेरच्या माणसांपासून संबंध तोडावे लागतात. त्यासाठी संबंधित मुलीला आधार देण्यासाठी ही समिती दुवा म्हणून काम करणार आहे. या शासन निर्णयामध्ये कोणत्याही प्रकारे समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न नाही. उलट दोन समाज जोडण्याचे काम या समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या आदेशाला आणि समितीला विरोध करणाऱ्यांनी प्रथम आदेश पूर्णपणे वाचावा, त्यानंतरच विरोध करावा, असेही लोढा यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra Politics: Over 1 Lakh Cases of 'Love Jihad' in Maharashtra; Information from Minister Mangalprabhat Lodha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.