मंत्रिपदाच्या संधीसाठी ‘परफॉर्मन्स फॉर्म्युला’; कोर्टातील ११ जुलैच्या सुनावणीनंतरच विस्तार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 06:40 AM2022-07-06T06:40:10+5:302022-07-06T06:40:55+5:30

न्यायालयाकडून शिंदे गटाला दिलासा मिळेल, असा दावा अन्य काही राज्यांमध्ये पूर्वी आलेल्या निकालांवरून केला जात आहे.

Maharashtra Politics: ‘Performance Formula’ for ministerial opportunities; CM Eknath Shinde Cabinet Extension only after the July 11 court hearing | मंत्रिपदाच्या संधीसाठी ‘परफॉर्मन्स फॉर्म्युला’; कोर्टातील ११ जुलैच्या सुनावणीनंतरच विस्तार

मंत्रिपदाच्या संधीसाठी ‘परफॉर्मन्स फॉर्म्युला’; कोर्टातील ११ जुलैच्या सुनावणीनंतरच विस्तार

Next

 मुंबई : मंत्री म्हणून संधी देताना इतर निकषांबरोबरच परफॉर्मन्स फॉर्म्युला वापरण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमत झाल्याचे समजते. जातीय, विभागीय संतुलन साधताना केवळ हे दोनच निकष न वापरता मंत्री म्हणून काम करण्याचा आवाका किती हे तपासून संधी दिली जाणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार ११ जुलैच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर होईल, असे सूत्रांनी सांगितले.

न्यायालयाकडून शिंदे गटाला दिलासा मिळेल, असा दावा अन्य काही राज्यांमध्ये पूर्वी आलेल्या निकालांवरून केला जात आहे. तरीही जोखीम न घेता ११ जुलैनंतरच विस्तार करावा यावर शिंदे-फडणवीस यांचे एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दीड-पावणेदोन वर्षात येणारी लोकसभेची,  त्यानंतर सहा-आठ महिन्यांतच विधानसभेची निवडणूक होईल. त्यामुळे परफॉर्मन्स फॉर्म्युला लावला जात आहे. कमी कालावधीत अधिक दमदार कामगिरी मंत्र्यांना दाखवावी लागणार आहे. 

...तर घरीदेखील बसायची तयारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सांगितल्यानंतर मी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले. माझ्यासाठी पक्षाचा आदेशच महत्त्वाचा आहे. जर पक्षाने सांगितले तर माझी घरीदेखील बसायची तयारी आहे - देवेंद फडणवीस, उपमुख्यमंत्री
 

Read in English

Web Title: Maharashtra Politics: ‘Performance Formula’ for ministerial opportunities; CM Eknath Shinde Cabinet Extension only after the July 11 court hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.