विलासरावांमुळेच महाराष्ट्र प्रगतिपथावर

By Admin | Published: August 12, 2014 01:40 AM2014-08-12T01:40:39+5:302014-08-12T01:40:39+5:30

१९९६ ते ९९ या युतीच्या कालावधीत महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट होता. अशा परिस्थितीत स्व. विलासराव मुख्यमंत्री झाले.

Maharashtra progress due to Vilasrao Ravan | विलासरावांमुळेच महाराष्ट्र प्रगतिपथावर

विलासरावांमुळेच महाराष्ट्र प्रगतिपथावर

googlenewsNext

लातूर : १९९६ ते ९९ या युतीच्या कालावधीत महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट होता. अशा परिस्थितीत स्व. विलासराव मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्यांनी आपल्या धोरणात्मक निर्णयाने महाराष्ट्राची पुन्हा उभारणी करून राज्याला प्रगतीपथावर आणले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केले. रेणा सहकारी साखर कारखान्यातर्फे कारखानास्थळी उभारलेल्या विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, वयाच्या ३७ व्या वर्षी राज्य मंत्रिमंडळात आलेल्या विलासरावांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा देशाच्या राजकारणावर उमटविला. लोकाभिमुख प्रशासक, शेतकऱ्यांचा नेता, अमोघ वाणीचा वक्ता असे त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलु होते. त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात विकास कामांचा डोंगर उभा केला. मराठवाड्याला मुख्य प्रवाहात आणले. त्यांची बरोबरी कुणीच करू शकत नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Maharashtra progress due to Vilasrao Ravan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.