महाराष्ट्राभिमानाचा नवा हुंकार ! सन्मान संध्येचे चौथे पर्व

By admin | Published: April 6, 2017 06:42 AM2017-04-06T06:42:06+5:302017-04-06T06:42:32+5:30

"लोकमत" समाजाला दिशा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे,

Maharashtra proud new hunker! Fourth Festival of Honor | महाराष्ट्राभिमानाचा नवा हुंकार ! सन्मान संध्येचे चौथे पर्व

महाराष्ट्राभिमानाचा नवा हुंकार ! सन्मान संध्येचे चौथे पर्व

Next

 14 क्षेत्रांतील सेवाव्रतींचा होणार गौरव

 

समाजातील घडामोडींचे वास्तव मांडत, आपल्या वेदनेच्या हुंकाराला न्याय देणारा "लोकमत" समाजाला दिशा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे, "लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर" पुरस्काराच्या रुपात ! यंदाच्या संभाव्य विजेत्यांच्या चर्चेबरोबरच "जय महाराष्ट्रीयन"चा हुंकार पुन्हा घुमू लागला आहे. नामांकितांबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी "लोकमत"ने सुरू केलेल्या पुरस्काराची आता परंपरा होऊ पाहात आहे. यंदाच्या चौथ्या पर्वातही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रीयनांना प्रगतीपथावर नेणाऱ्यांमधून लोकमत"महाराष्ट्रीयन आॅफ द इयर" चे मानकरी ठरविण्याची प्रक्रिया "लोकमत"च्या संपादकीय चमूने केलेले मंथन, राज्यभरातील कोट्यवधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून साकारत आहे.

विविध आवृत्यांच्या क्षेत्रातील कर्तृत्ववान पण अप्रकाशित व्यक्तिमत्वांचा शोध आणि माहिती घेऊन तयार झालेल्या विस्तृत यादीतून लोकमत मीडिया लि.चे अध्यक्ष खा. विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संपादकीय मंडळाच्या बैठकीत साकल्याने चर्चा होऊन बारा क्षेत्रांतील नामांकनासाठी संपादकीय चमूने शिफारस केलेल्या नावातून प्रत्येक क्षेत्रातील किमान पाच नावे ज्युरींच्या विचारार्थ देण्यासाठी निवडण्यात आली. नामांकन प्राप्त व्यक्तिंना महाराष्ट्रभरातील वाचकांनी एसएमएस आणि फेसबुकद्वारे दिलेली पसंती तसेच आठ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरणार आहेत.

प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या मान्यवरांप्रमाणेच राज्याच्या कानाकोपऱ्यात इतरांना प्रेरणादायी ठरेल, अशा कार्याचे बीज पेरणाऱ्यांचाही शोध घेतला गेला. पुरस्काराच्या या चौथ्या पर्वात जबाबदारी आणखी वाढली आहे. याचे भान राखत आणि समाजमनावर प्रभाव टाकणाऱ्या तसेच विकास आणि समृद्धीच्या वाटचालीत भर टाकलेल्या नानाविध क्षेत्रांचा आरसा म्हणून "लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर" पुरस्कारांकडे पाहिले जाईल.

समाजमनाचा आरसा असलेल्या "लोकमत"ने समाजप्रक्रियेत सकारात्मक बदल घडविणाऱ्या आणि प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.

---------------------------------------

गौरवशाली इतिहास लाभलेल्या आपल्या राज्याला आज अनेक क्षेत्रांत आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आव्हाने मोठी असली तरी त्याने खचून न जाता दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगून अनेक लोक कार्यरत आहेत. अशांच्या कार्याचा यथोचित गौरव करीत असतानाच त्यांच्याविषयी महाराष्ट्राच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना त्यामागे आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या कर्तृत्त्ववान मान्यवरांचा सन्मान करतानाच इतरांसाठी प्रेरणेचा स्त्रोत ठरू शकणाऱ्या पण, प्रसिद्धीच्या झोतात न आलेल्या कानकोपऱ्यातील माणसांचाही भाषा-वेशभूषा, संस्कार-संस्कृती, जात-पात यांच्यापलीकडे जाऊन गुणगौरव करण्याचा वसा आम्ही घेतला आहे.

- खा. विजय दर्डा, अध्यक्ष, लोकमत मीडिया लि.

हे आहेत यंदाचे ज्युरी 

नितीन गडकरी द्रष्टा व निर्णयक्षम राजकारणीदेशातील पायाभूत सुविधांचा आधुनिक विश्वकर्मा.

मिलिंद देवरा माजी खासदार व नव्या पिढीचा सुशिक्षितसुसंस्कृत चेहराकाँग्रेसमधील मृदुभाषी तरुण तुर्क.

अर्णब गोस्वामी भारतातील टेलिव्हिजन पत्रकारितेला नवा जागतिक आयाम देणारा आक्रमक पत्रकार.

महेश भट सर्जनशील सिने दिग्दर्शक आणि संवेदनशील भाष्यकार.

डॉप्रकाश आमटे उपेक्षित-वंचितांना प्रकाशवाटा दाखविणारा सामाजिक दीपस्तंभ.

डॉरमाकांत पांडारुग्णांच्या ह्रदयाची हाक ऐकण्याचे सामर्थ्य `सर्जन`शील हातांना देणारा किमयागार जीवनदाता.

सुनील सूद कम्युनिकेशनच्या प्रांतातील आधुनिक संवाददूतव्होडाफोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक.

विक्रम श्रॉफ तंत्रज्ञानातून शेतीला नवसंजीवनी आणि समृद्ध आयाम देणा-या युपीएल चे कार्यकारी संचालक.

विक्रम लिमये लेखा परीक्षणातील कौशल्यातून उद्योगांना नवा अर्थ देणारा शिल्पकारआयडीएफसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीइअओ.

 

मृणाल कुलकर्णी बौद्धिक वारशाला अभिनय व दिग्दर्शनाचे कोंदण लाभलेला सुसंस्कृत चेहरा.  

Web Title: Maharashtra proud new hunker! Fourth Festival of Honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.