Maharashtra Rain Live Updates : राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम राहणार; मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 09:55 AM2021-08-31T09:55:43+5:302021-08-31T13:03:23+5:30
मुंबई - आजपासून मुंबईत पावसाने पुन्हा एकदा जोर धरण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भात निर्माण झालेला कमी ...
मुंबई - आजपासून मुंबईत पावसाने पुन्हा एकदा जोर धरण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकत असल्याने मुंबईतील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर वाढेल, असा इशारा देण्यात आला आहे. ३१ ऑगस्ट रोजी ठाणे आणि रायगडमध्ये काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
LIVE
02:53 PM
हायवेखाली दीड ते दोन फूट साचलं पाणी
मुंबईसह पश्चिम उपनगरात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले या ठिकाणी हायवेखाली दीड ते दोन फूट साचलं पाणी #MumbaiRains#Mumbaipic.twitter.com/2DbbwJ1moM
— Lokmat (@MiLOKMAT) August 31, 2021
02:26 PM
मालाड पूर्वेच्या कुरार गावातील आंबेडकर नगरमध्ये काही घरांवर दगड आणि पावसाचे पाणी, १०० रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले.
02:03 PM
मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस; रस्ते वाहतुकीला फटका
Mumbai Rain Updates : मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस; रस्ते, रेल्वे वाहतुकीला फटका#MumbaiRains#Mumbaipic.twitter.com/PLsbeCisxi
— Lokmat (@MiLOKMAT) August 31, 2021
01:07 PM
जाणून घ्या महाराष्ट्रात किती आणि कुठे कुठे पाऊस पडेल
जाणून घ्या महाराष्ट्रात किती आणि कुठे कुठे पाऊस पडेल. हवामान विभागाचे बुलेटीन जारी. #Rain#MaharashtraRainshttps://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/mpawSsHxre
— Lokmat (@MiLOKMAT) August 31, 2021
01:02 PM
आज दिवसभरात राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम राहणार आहे. उत्तर कोकणात (मुंबई) पावसाचे प्रमाण अधिक राहील
12:45 PM
मुंबई शहराच्या तुलनेत पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर येथे अधिक पावसाची नोंद झाली आहे.
12:36 PM
चाळीसगाव ग्रामीण भागातील नागरिकांना शाळांमध्ये हलविले
चाळीसगाव शहराला महापुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. परिस्थिती गंभीर झाली आहे.प्रशासनाने नदीकाठालगतच्या नागरिकांसाठी नेताजी चौकातील आनंदीबाई बंकट विद्यालयात मदत कक्ष सुरू केला आहे. न.पा.ची टीम यासाठी सर्तक करण्यात आली आहे. ग्रामीण भागातही शाळांमध्ये नागरिकांना हलविण्यात येत आहे. अशी माहिती तहसिलदार अमोल मोरे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
12:30 PM
राज्यात पुढील तीन ते चार दिवस मान्सून पुन्हा सक्रिय
पालघरमध्ये मंगळवारी येलो अलर्ट तर १ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात पुढील तीन ते चार दिवस मान्सून पुन्हा सक्रिय होईल. या काळात ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबई या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी व्यक्त केली आहे.
12:08 PM
डहाणूत काही गावांशी संपर्क तुटला, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या...
डहाणूत काही गावांशी संपर्क तुटला. नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. #rains#Maharashtrahttps://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/pWUzWsCqGG
— Lokmat (@MiLOKMAT) August 31, 2021
11:33 AM
४० गावांना पाण्याचा वेढा
अहमदनगर - शेवगाव तालुक्यातील ४० गावांना पाण्याचा वेढा, जनावरे गेली वाहून
11:23 AM
चाळीसगाव येथील बामोशी बाबा दर्गापर्यंत पाणी, भाविकांची मोठी तारांबळ उडाली.
11:17 AM
चाळीसगावात एसडीआरएफची टीम दाखल
चाळीसगाव शहर व ग्रामीण भागात महापूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने महसूल प्रशासनाने एसडीआरएफ पथकाची मागणी केली होती. त्यानुसार धुळे येथील ३० जणांचे पथक येथे दाखल झाले आहे. कन्नड घाटातील दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. कन्नड घाटातील वाहतूक थांबविण्यात आली आहे. प्रवाशी वाहने व मालवाहू वाहने नांदगाव व सिल्लोडमार्गे जळगावकडे वळविण्यात आली आहे. घाटाच्या मध्ये काही प्रवाशी अडकून पडले आहे. ग्रामीण भागातही तातडीची मदत पोहचविण्याचे प्रशसनासमोर आव्हान आहे.
11:06 AM
कन्नड घाटात दरड हटविण्याचे काम सुरू
कन्नड घाटात दरड हटविण्याचे काम सुरू, शहराला पाण्याचा वेढा, पावसाचा जोर पुन्हा वाढला, सकाळी १० वाजता पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात
10:51 AM
शेवगाव तालुक्यात जोरदार पाऊस
10:51 AM
पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प
अहमदनगर - नगर-कल्याण रोडवरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प, नगर-औरंगाबाद रोडवरील जेऊर येथील पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक तीन वाजेपासून बंद होती.
10:43 AM
मुसळधार पावसामुळे डहाणूत भरले पाणी
10:35 AM
तिसगाव, पाथर्डी तालुक्यातील नदीला पूर
अहमदनगरच्या दक्षिण भागात रात्रभर संततधार, नद्या-नाल्यांना पूर.#Rain#Ahmadnagarhttps://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/qrh8lxaSOB
— Lokmat (@MiLOKMAT) August 31, 2021
10:24 AM
कन्नड घाटात दरड कोसळली. वाहतूक बंद. सुरळीत करण्याचे काम सुरू
कन्नड घाटात दरड कोसळली. वाहतूक बंद. सुरळीत करण्याचे काम सुरु. https://t.co/CbvSFUjpi9#Rain#landslide#aurangabadpic.twitter.com/YxXouEonC7
— Lokmat (@MiLOKMAT) August 31, 2021
10:15 AM
डहाणूत पावसाचा तडाखा, सखल भागात पूरस्थिती
बोर्डी - हवामान विभागाने 31 ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवून एलो अलर्ट दिला होता. त्याप्रमाणे रात्रीपासून पावसाचा तडाखा बसत असून मुसळधार पावसासह ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत सुरू आहे. यामुळे तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी पातळी वाढू लागली आहे.
10:09 AM
औरंगाबाद : कन्नड घाटात मुसळधार पावसामुळे तीन ठिकाणी दरड कोसळली. औरंगाबाद-धुळे महामार्ग ठप्प.
10:08 AM
अहमदनगरच्या दक्षिण भागात रात्रभर संततधार, नद्या-नाल्यांना पूर
10:06 AM
भोरटेक ता. भडगाव या गावाला पाण्याचा वेढा
10:01 AM
शहरात बाजारपेठेतही शिरले पाणी, पशुधनाचे नुकसान
09:59 AM
चाळीसगाव परिसरात नदी-नाल्यांना पूर
चाळीसगाव जि.जळगाव - शहर व ग्रामीण भागात मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार कायम राहिल्याने बुधवारी पहाटे डोंगरी व तितूर या नद्यांना मोठा पूर आला. शहराच्या दक्षिणेला असणाऱ्या वाघडू, वाकडी, रोकडे, वाघले, बाणगाव येथे गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. मध्यरात्री व पहाटे पूर आल्याने पशुधनाचे नुकसान झाले आहे. अनेक जनावरे दगावली आहेत. तालुक्यातील १४ मध्यम जल प्रकल्पांपैकी १० धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. शहरात बामोशी बाबा दर्गाह परिसरासह, मुख्य बाजार पेठ, दोस्त टाॕकीज परिसर जलमय झाला आहे.
09:57 AM
मुंबईतील काही भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार सरी कोसळणार
मुंबईत सोमवारी सांताक्रुझ वेधशाळेने ०.७ मिलिमीटर पावसाची नोंद केली आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर हे दोन दिवस मुंबईतील काही भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार सरी कोसळणार आहेत.