Maharashtra Rain Live Updates : लोकलची हार्बर लाईन ठप्प, 1 तासांपासून प्रवाशी खोळंबले

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 08:13 AM2019-07-01T08:13:19+5:302019-07-01T22:25:58+5:30

मुंबई - मुंबई शहरासह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक या दोन्ही सेवांवर ...

maharashtra rain live updates mumbais central western and harbour trains running late | Maharashtra Rain Live Updates : लोकलची हार्बर लाईन ठप्प, 1 तासांपासून प्रवाशी खोळंबले

Maharashtra Rain Live Updates : लोकलची हार्बर लाईन ठप्प, 1 तासांपासून प्रवाशी खोळंबले

Next

मुंबई - मुंबई शहरासह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक या दोन्ही सेवांवर परिणाम झाला आहे. तसेच पावसामुळे तिन्ही रेल्वे मार्गांवरील लोकलसेवा उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने, हार्बर 10 मिनिटे उशिराने, पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. पालघरमध्ये मुसळधार पाऊस असून जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. दक्षिण गुजरात तसेच पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. वलसाड फास्ट पॅसेंजर, फ्लाइंग राणी यांच्यासह अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्यामुळे विदर्भासह मध्य भारतातील अनेक राज्यांत पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. 1 आणि 2 जुलैला विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 2 जुलैला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल. 3 जुलैला कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस, तर 4 जुलैला कोकण, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.

LIVE

Get Latest Updates

10:47 PM

कुर्ला, वाशी अन् नवी मुंबईत जोरदार पाऊस

मुंबई उपनगरात पावसामुळे चाकरमान्यांचे हाल, लोकलचा खोळंबा. कुर्ला, वाशी आणि नवी मुंबईत जोरदार पाऊस

10:25 PM

हार्बर लाईनवरील वाहतूक ठप्प, तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशी खोळंबले

तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवरील वाहतूक ठप्प, सीएसएमटीवरुन पनवेलला जाणाऱ्या गाड्या 1 तासापासून बंद असल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. तथापी, तांत्रिक बिघाडाचे काम पूर्ण झाल्यानंतरच वाहतूक सुरू होईल, अशी सूचना करण्यात येत आहे. 

06:50 PM

जुने नाशिक गावठाण परिसरात पावसामुळे वाड्याची भिंत कोसळली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले .

04:02 PM

पुढच्या 24 तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा, अंधेरी, कांदिवली, जोगेश्वरीत जोरदार पाऊस

03:51 PM

गेल्या 24 तासांपासून मुंबईत मुसळधार पाऊस, रेल्वे अधिकारी परिस्थितीवर नजर ठेवून...



 

02:02 PM

मुसळधार पावसानं रेल्वे वाहतुकीवर परिणाम. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल हेदेखील मुंबईच्या रेल्वे सेवेवर नजर ठेवून



 

02:01 PM

ठाणे स्थानकात गर्दी, तब्बल एक तास ट्रेन लेट

01:50 PM

सायन-पनवेल महामार्ग नेरुळ उरण फाटा येथे रोडवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

01:25 PM

पावसाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकरांची मरीन ड्राईव्हवर गर्दी



 

01:09 PM

ठाणे : भिवंडीतील सखल भागात पाणी साचले


12:56 PM

सायन रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी साचलं


12:43 PM

सातारा : महाबळेश्वर-तापोळा रोडवर झाड कोसळले,  झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

12:35 PM

मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका


12:20 PM

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका, कर्जत-खोपोली रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प


12:10 PM

सीबीडी बेलापूरमधील कोकण भवन इमारतीच्या तळ मजल्यावर साचले पाणी

12:00 PM

मुंबई : गोवंडीत विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू. शिवाजीनगर भागातील घटना.

11:56 AM

Mumbai Rain Update: पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत; 'या' गाड्या रद्द



11:37 AM

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 24 तासांत वाढला 17 हजार दशलक्ष लिटर जलसाठा

11:37 AM

हार्बर रेल्वेवर अर्ध्या तासापासून लोकल रखडल्या, वाशी ते पनवेल दरम्यान सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम

11:31 AM

सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतूक मंदावली


11:23 AM

मुंबई : विमान वाहतूक 25 ते 30 मिनिटे उशिराने

11:19 AM

मुंबईत जोरदार पाऊस


11:11 AM

मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम, प्रवाशांचा खोळंबा


11:04 AM

नवी मुंबई - सीबीडी बेलापूरमधील कोकण भवन इमारतीच्या तळ मजल्यावर साचले पाणी, विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कोकणभवनमधील कामकाज ठप्प.

11:00 AM

हार्बर रेल्वेवर मानखुर्द-चुनाभट्टीजवळ ट्रॅकवर पाणी साचलं. लोकल 30 मिनिटे उशिराने

10:54 AM

धीम्या मार्गावर लोकलची रांग, मुलुंड ते घाटकोपरदरम्यान एकामागोमाग एक लोकल खोळंबल्या

10:51 AM

मुलुंड, भांडुप, कांजुर, विक्रोळीत रिमझिम पाऊस

10:49 AM

Mumbai Train Update : सायन-माटुंग्यात track वर पाणी; लोकलचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

10:44 AM

मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस, वाहतूक मंदावली तर रेल्वेसेवाही उशिराने


10:34 AM

फ्री वेवर वाहतूक कोंडी

10:30 AM

पश्चिम रेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी


10:25 AM

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्ग नेरुळ उरण फाटा येथे रोडवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

10:15 AM

आजपासून चार दिवस पावसाचे; 13 जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण बरसला


10:06 AM

कर्जत-खोपोली रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प

10:01 AM

कुर्ला, सायन आणि माटुंगा परिसरातील बहुतांश शाळांना सुट्टी जाहीर.


09:44 AM

मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने, हार्बर 10 मिनिटे उशिराने, पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.


09:39 AM

कसारा घाटात दरड कोसळली

09:32 AM

पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक धीम्यागतीने, कल्याणकडून येणाऱ्या गाड्या खोळंबल्या

09:32 AM

बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी, मुलुंड, ठाणे, दादर भागात मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचलं आहे.



 

09:26 AM

मुंबई : चर्चगेट-मरिनलाईन्स ओव्हरहेड वायर तुटली, पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम

09:19 AM

चर्चगेट-मरिनलाईन्स ओव्हरहेड वायर तुटली



 

09:14 AM

कसारा घाटात दरड कोसळली

09:07 AM

मुंबई - चर्चगेट-मरिनलाईन्स ओव्हरहेड वायर तुटली, पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम

08:59 AM

सायन-माटुंगा रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले

08:52 AM

मुंबई परिसरात मुसळधार पाऊस, सायन आणि हिंदमाता परिसरात पाणी साचलं



 

08:47 AM

वलसाड फास्ट पॅसेंजर, फ्लाइंग राणी यांच्यासह अनेक लोकल गाड्या रद्द


08:43 AM

लोकलसेवा उशिराने

पावसामुळे तिन्ही रेल्वे मार्गांवरील लोकलसेवा उशिराने सुरू आहे. 

08:36 AM

दक्षिण गुजरात तसेच पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत


08:36 AM

पालघर स्टेशनवर एक्स्प्रेस रखडल्या


08:27 AM

पालघर : पालघरमध्ये मुसळधार पाऊस, जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी साचले


08:21 AM

मुंबई-पुणे मार्गावर मालगाडी घसरल्याने वाहतूक विस्कळीत, अनेक गाड्या रद्द



 

08:19 AM

रेल्वे सेवेला फटका, अनेक ट्रेन रद्द



 

08:16 AM

कर्जत-लोणावळा सेक्शनमधील घाटामध्ये मालगाडीचे डबे घसरल्याने वाहतुकीचा खोळंबा



 

08:15 AM

मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस
 

Web Title: maharashtra rain live updates mumbais central western and harbour trains running late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.