Rain Updates: पालघर, पनवेल, ठाणे, अंबरनाथमध्ये मुसळधार; मुंबईतही संततधार, पुढील ३ ते ४ तास अलर्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 05:23 PM2021-06-17T17:23:48+5:302021-06-17T17:31:26+5:30
Rain Updates: गेल्या दोन तासांपासून पालघर, डहाणू, विरार, नालासोपारा, वसईसह ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापुरात मुसळधार पाऊस सुरू असून येत्या तीन ते चार तासांत अतिमुसळधार पावासाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Rain Updates: गेल्या दोन तासांपासून पालघर, डहाणू, विरार, नालासोपारा, वसईसह ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापुरात मुसळधार पाऊस सुरू असून येत्या तीन ते चार तासांत अतिमुसळधार पावासाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
मुंबईतही सकाळपासून संततधार सुरू असून पुढील तीन तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सांताक्रूझ, विरार, पालघर, डहाणू, बोरिवली, कल्याण, पनवेल, अलिबाग, खंडाळा, सातारा घाटमाथ्याचा परिसर आणि पुणे येथे ढगांच्या गडगडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
VIDEO: ठाणे शहरातील वंदना सिनेमाजवळ साचलं पावसाचं पाणी (व्हिडिओ सौजन्य: विशाल हळदे)#RainUpdatespic.twitter.com/OdHpKcJP3t
— Lokmat (@MiLOKMAT) June 17, 2021
वसईच्या पश्चिम पट्ट्यातील गास गाव पाण्याखाली गेलं असून गावाला जोडणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. बाजूलाच सनसिटी हा उचभ्रू रहिवासी भाग असून त्यातच संपूर्ण खार जमीन असल्याने येथे दरवर्षी पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढते. तर ठाण्यात सकाळपासून संततधार सुरू होती. तर संध्याकाळच्या सुमारात पावसाचा जोर वाढल्यानं वंदना सिनेमा परिसरात पाणी साचलं आहे. तसंच इतरही सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
VIDEO: वसईच्या पश्चिम पट्ट्यातील गास गावात साचलं पावसाचं पाणी, मुख्य रस्ता पाण्याखाली#RainUpdatespic.twitter.com/uLZhQeiklT
— Lokmat (@MiLOKMAT) June 17, 2021