Maharashtra Rain Update: राज्यात उद्यापासून सर्वदूर पावसाचा जोर वाढणार; ३० ऑगस्ट रोजी मुंबई, कोकणसह मराठवाडा, विदर्भासाठी अलर्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 03:19 PM2021-08-28T15:19:17+5:302021-08-28T15:19:44+5:30
Maharashtra Rain Update: गेल्या काही दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाचं राज्यात उद्यापासून पुढील चार दिवस पुन्हा आगमन होणार असल्याचा अंदाज
Maharashtra Rain Update: गेल्या काही दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाचं राज्यात उद्यापासून पुढील चार दिवस पुन्हा आगमन होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याचा पश्चिम व मध्य भारत क्षेत्रातून प्रवासाच्या शक्यतेमुळे राज्यात येत्या ४ ते ५ दिवसांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
Severe weather warnings issued by IMD for 27-31 Aug for Maharashtra.For details pl visit @RMC_Mumbai & @RMC_Nagpur website
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 27, 2021
Day 1 -4 most of warnings r for Eastern Mah, both TS & Heavy RF.For Day 5 the warnings also included for parts of Konkan &Madhya Mah for isol heavy rainfall pic.twitter.com/EGWyxCcIbj
राज्यात ३० ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार असून परभणी, नाशिक, ठाणे, रायगडसह कोकण पट्टा आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या सरी बसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.