महाराष्ट्र रत्नांना ‘लाख’मोलाची पसंती !
By admin | Published: March 26, 2016 03:35 AM2016-03-26T03:35:12+5:302016-03-26T03:35:12+5:30
‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इअर’ पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्र रत्नांना मतदान करण्यासाठी जनमानसात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, लोकमत वाचकांनी
मुंबई : ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इअर’ पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्र रत्नांना मतदान करण्यासाठी जनमानसात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, लोकमत वाचकांनी केलेल्या मतदानाने लाखाचा आकडा कधीच पार केला आहे.
लोकमत समूहातर्फे सन्मानपूर्वक प्रदान केल्या जाणाऱ्या महाराष्ट्रीयन आॅफ द इअर पुरस्कारांसाठी लोकसेवा-समाजसेवा, विज्ञान तंत्रज्ञान, परफॉर्मिंग आर्ट, कला, क्रीडा, रंगभूमी, चित्रपट, इन्फ्रास्ट्रक्चर, बिझनेस, प्रशासन आणि सर्वांच्या उत्सुकतेचे क्षेत्र राजकारण अशा १४ विभागातील नामांकने जाहीर झाली आणि सर्वत्र आपापल्या पसंतीनुसार मतदान करण्यास लोकांनी कमालीचा उत्साह दाखवला आहे. १४ विभागातील सर्वच नामांकने आमच्यासाठी विजेते आहेत.
१४ क्षेत्रांमधील नामांकनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या नावांची त्यांच्या कामाच्या तपशिलासह लोकमतच्या सर्व आवृत्त्यांच्या संपादकांकडून शिफारस मागवण्यात आली. नामांकनासाठी आलेल्या नावांमधून स्पष्ट मापदंडांच्या आधारे वरिष्ठ संपादकांच्या चमूकडून प्रत्येक क्षेत्रातील पाच नावांची शिफारस झाली. ही करत असताना, समाजावरील प्रभाव, कामाची स्वीकारार्हता आणि उपयोगिता, कामातील वेगळेपणा आणि नवोन्मेष, प्रतिकूल परिस्थितीतून संधी शोधण्याची तसेच आव्हानांवर मात करण्याची सिद्ध केलेली क्षमता यांचा विचार करण्यात आला. त्यातून निवडण्यात आलेल्या नामांकनांवर वाचकांची पसंती वेबसाइटच्या माध्यमातून मतदानाद्वारे मिळत आहे. कालपर्यंत १ लाखाहून अधिक लोकांनी मतदान केले आहे. ३0 मार्चपर्यंत मतदानाची अंतिम तारीख आहे. मतदानाचा ओघ नामांकने मिळालेल्या प्रत्येकाच्या कामासाठी मन:पूर्वक मिळणारी दाद आहे.
आॅनलाइन मतदान असे करता येईल !
नामांकने www.lokmat.com येथे जाहीर करण्यात आली आहेत. आपण या साईटवर जा. तेथे ‘व्होट नाऊ’ असे लिहिलेले असेल. त्यावर क्लिक केले की आपल्यासमोर मतदानासाठी सगळी नामांकने येतील.
विविध विभागांसाठीच्या नामांकनांची यादी आपल्याला तेथे दिसेल. फोटोवर क्लिक केल्यास त्या व्यक्तीविषयीची माहिती येईल आणि आपल्याला ज्या व्यक्तीला मतदान करायचे आहे त्याच्या नावावर क्लिक केल्यास आपले मत त्या व्यक्तीस मिळेल.
एका विभागात एकाच व्यक्तीला मतदान करता येईल. सगळ्यात शेवटी ‘कन्फर्म व्होट’ असे लिहिलेले आहे. त्यावर क्लिक केल्यास आपली मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. आपण कोणत्या विभागासाठी कोणाला मतदान केले आहे त्याची यादी त्यानंतर लगेच आपल्याला दिसेल.