Maharashtra Ready Reckoner Rate 2022: घर घेणं महागणार! राज्यात 'रेडी रेकनर'च्या दरात सरासरी ८.८० टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 08:44 PM2022-03-31T20:44:03+5:302022-03-31T20:45:02+5:30

नवं घर घेण्याचं स्वप्न तुम्ही पाहात असाल तर एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून रेडी रेकनरचे नवे दर जारी केले असून यावेळी राज्यात सरासरी ८.८० टक्के दरवाढ झाली आहे.

Maharashtra Ready Reckoner Rate 2022 Buying a house will be expensive Ready Reckoner rates in the state increase by an average of 8 80 percent | Maharashtra Ready Reckoner Rate 2022: घर घेणं महागणार! राज्यात 'रेडी रेकनर'च्या दरात सरासरी ८.८० टक्के वाढ

Maharashtra Ready Reckoner Rate 2022: घर घेणं महागणार! राज्यात 'रेडी रेकनर'च्या दरात सरासरी ८.८० टक्के वाढ

googlenewsNext

मुंबई-

नवं घर घेण्याचं स्वप्न तुम्ही पाहात असाल तर एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून रेडी रेकनरचे नवे दर जारी केले असून यावेळी राज्यात सरासरी ८.८० टक्के दरवाढ झाली आहे. त्यामुळे घर घेणं आता आणखी महाग होणार आहे. कोरोना काळामुळे गेल्या दोन वर्षांपासून रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यात आली नव्हती. पण आता ठाकरे सरकारनं नवे दर जारी करुन धक्का दिला आहे. पण मुंबई वगळता रेडी रेकनरचे दर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. वर्ष २०२२-२३ वर्षासाठी हे नवे दर लागू असतील. राज्यात सरासरी ८.८० टक्के इतकी वाढ रेडीरेकरनच्या दरात जाहीर करण्यात आली आहे.

राज्याच्या ग्रामीण भागात सरासरी ६.९६ टक्के वाढ लागू होणार आहे. नगरपालिका तसेच नगरपंचायती क्षेत्रात ३.६२ टक्के वाढ आणि महापालिका क्षेत्रात ८.८० टक्के वाढ (मुंबई वगळता) लागू करण्यात आली आहे. राज्यात रेडी रेकनरच्या दरात मुंबई वगळता एकूण ५ टक्के सरासरी दरवाढ झाली आहे. तर एकूण दरवाढ ८.८० टक्के इतकी असणार आहे. बृहन्मुंबई क्षेत्रातील सरासरी वाढ २.३४ टक्के इतकी आहे. पण यामध्ये मुंबईचा समावेश करण्यात आलेला नाही. याआधीच नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने २०२२-२३ वर्षासाठी राज्यात रेडी रेकनर म्हणजे जमिनीच्या वार्षिक बाजारमूल्य दरात वाढ प्रस्तावित केली होती. यासाठी शासनाची मान्यता मिळणे अपेक्षित होते. आता राज्य शासनाच्या मंजूरीनंतर सर्व जिल्ह्यांच्या नोंदणी व मुद्रांक विभागाकडून या नव्या रेडी रेकनरच्या दराची अंमलबजावणी होणार आहे. 

कुठे किती दरवाढ ?
ग्रामीण क्षेत्र ६.९६ टक्के
प्रभाव क्षेत्र ३.९०
नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्र ३.६२
महापालिका क्षेत्र ८.८० (मुंबई वगळता)
राज्याची सरासरी वाढ – ५ टक्के (मुंबई वगळता)
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सरासरी वाढ – २.३४ टक्के

Web Title: Maharashtra Ready Reckoner Rate 2022 Buying a house will be expensive Ready Reckoner rates in the state increase by an average of 8 80 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.