आतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 04:39 AM2019-09-22T04:39:47+5:302019-09-22T06:34:08+5:30

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत पावसाने मुंबईसह राज्य आणि देशाला झोडपून काढले

Maharashtra recorded 8% more rainfall till date | आतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद

आतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद

Next

मुंबई : जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत पावसाने मुंबईसह राज्य आणि देशाला झोडपून काढले असून, २१ सप्टेंबरपर्यंतच्या मान्सूनच्या नोंदीचा विचार करता महाराष्ट्रात १ हजार २५७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात सरासरी या काळात ९५४.६ मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. प्रत्यक्षात या वेळी ३२ टक्के जास्त पाऊस पडला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादरा नगर हवेली येथे देशात सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. त्याखालोखाल सिक्कीम, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबार येथे जास्त पावसाची नोंद झाली आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, छत्तीसगड, ओरिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळमध्ये सर्वसाधारण पावसाची नोंद झाली आहे. तर जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल येथे कमी पावसाची नोंद झाली असून, सर्वांत कमी पाऊस मणिपूरमध्ये झाला आहे.

राज्यनिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये
जम्मू-काश्मीर ४२७.७
हिमाचल प्रदेश ६३३.३
पंजाब ४०८.२
हरयाणा २४६.०
उत्तराखंड ८७९.०
उत्तर प्रदेश ५९६.१
बिहार ७८४.७
सिक्कीम १८२६.४
आसाम १२३४.८
अरुणाचल प्रदेश १४४५.४
नागालँड ८८०.२
मणिपूर ५३१.७
मिझोराम १५५०.८
त्रिपुरा १३८३.८
मेघालय २२८४.६
पश्चिम बंगाल १३११
झारखंड ६९२.५
ओडिशा १११४.८
छत्तीसगड ११४५.२
तेलंगणा ७२४.९
आंध्र प्रदेश ४८९.३
तामिळनाडू ३३०.0
पद्दूचेरी ५०६.८
केरळ २२१९.४
कर्नाटक ९५०.७
गोवा ३८७४.९
महाराष्ट्र १२५७.७
दादरा ३५६९.६
नगर हवेली
मध्य प्रदेश १२३३.१
गुजरात ८८४.७
राजस्थान ५४९.९
लक्षद्वीप ११६०.८
अंदमान निकोबार- २२८७.२

Web Title: Maharashtra recorded 8% more rainfall till date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस