महाराष्ट्र सावरतोय! राज्यात आज १२,५५७ रुग्णांची नोंद; बरं होण्याचं प्रमाण ९५ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 09:16 PM2021-06-06T21:16:12+5:302021-06-06T21:17:20+5:30

Maharashtra Corona Update: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आता दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १२ हजार ५५७ नव्या रुग्णांची भर पडली असून १४ हजार ४३३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.

Maharashtra records 12557 new cases 233 deaths and 14433 discharges today | महाराष्ट्र सावरतोय! राज्यात आज १२,५५७ रुग्णांची नोंद; बरं होण्याचं प्रमाण ९५ टक्क्यांवर

महाराष्ट्र सावरतोय! राज्यात आज १२,५५७ रुग्णांची नोंद; बरं होण्याचं प्रमाण ९५ टक्क्यांवर

Next

Maharashtra Corona Update: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आता दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १२ हजार ५५७ नव्या रुग्णांची भर पडली असून १४ हजार ४३३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण आता ९५.०५ टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज एकूण २३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या २ लाखांच्या खाली
राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या आता १ लाख ८५ हजार ५२७ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असली तरी त्यात सातत्यानं घट होताना दिसत आहे. पुण्यात एकूण २१ हजार २१६ इतके सक्रीय रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १८ हजार ०४१ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १६ हजार ६७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १८ हजार ७३४ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ९ हजार २४४ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ८९१ इतकी आहे.
 

Web Title: Maharashtra records 12557 new cases 233 deaths and 14433 discharges today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.