Coronavirus Update : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आजवरची सर्वाधिक नोंद; आढळले ३५,९५२ नवे कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 09:22 PM2021-03-25T21:22:08+5:302021-03-25T21:24:22+5:30
Coronavirus : बुधवारी आढळले होते ३१,८५५ नवे रुग्ण, गेल्या चोवीस तासांत मुंबईतही सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना विषाणूची महासाथ सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच बुधवारी राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात बुधवारपेक्षाही अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. गेल्या चोवीस तासांत राज्यात आजवरची सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. गेल्या चोवीस तासांत राज्यात ३५ हजार ९५२ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दुसरीकडे थोडी दिलासादायक बाब म्हणजे २० हजार ४४४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.
राज्यात आतापर्यंत २६ लाख ८३३ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत २२ लाख ८३ हजार ०३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात सध्या २ लाख ६२ हजार ६८५ अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत ५३ हजार ७५९ मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८७.७८ टक्के असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
Maharashtra reports 35,952 fresh COVID-19 cases, 20,444 discharges, and 111 deaths in the last 24 hours
— ANI (@ANI) March 25, 2021
Total cases: 26,00,833
Total recoveries: 22,83,037
Death toll: 53,795
Active cases: 2,62,685 pic.twitter.com/MN07FtljNF
मुंबईतही सर्वाधिक रुग्णवाढ
गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईत आतापर्यंतचे सर्वाधिक ५ हजार ५०४ रूग्णांची नोंद करण्यात आली. यापूर्वी बुधवारी सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईत ५ हजार ५०४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २ हजार २८१ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. दरम्यान, या कालावधीत मुंबईत १४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या मुंबईत एकून ३३ हजार ९६१ अॅक्टिव्ह केसेस आहे.
मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ११ हजार ६२० मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान यापूर्वी बुधवारी राज्यात ५ हजार १८५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. मार्च २०२० नंतरची ही सर्वाधिक नोंद होती. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांच्या दुपटीचा दर ७५ दिवसांवर आला असून रुग्ण बरे होण्याचा दरही ८८ टक्के इतका असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली.