Coronavirus: मोठा दिलासा! राज्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट; ३३ हजार जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 08:33 PM2021-05-31T20:33:08+5:302021-05-31T20:34:29+5:30
Coronavirus: राज्यातील जनतेसाठी मोठा दिलासा देणारे वृत्त आहे.
मुंबई: राज्यातील जनतेसाठी मोठा दिलासा देणारे वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्येत मोठी घट झाली असून, सोमवार दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट असल्याची माहिती मिळाली आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत तब्बल ३३ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९३.८८ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण १५ हजार ०७७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 15 077 new corona cases and 184 deaths in last 24 hours)
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत १५ हजार ०७७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याच कालावधीत १८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ३३ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५३ लाख ९५ हजार ३७० रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.६६ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण २ लाख ५३ हजार ३६७ आहे.
Maharashtra reports 15,077 new #COVID19 cases, 184 deaths, and 33,000 discharges in the last 24 hours
— ANI (@ANI) May 31, 2021
Case tally 57,46,892
Active cases 2,53,367 pic.twitter.com/UXyfEqOu4G
मुंबईकरांनाही मोठा दिलासा
गेल्या सलग काही दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ६७६ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ५ हजार ५७० रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत २९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १४ हजार ८८४ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे २२ हजार ३९० उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.१५ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ४३३ दिवसांवर गेला आहे.
Mumbai records 676 new #COVID19 cases, 5570 recoveries, and 29 deaths in the last 24 hours; active cases at 22,390 pic.twitter.com/FHcPkLqsvk
— ANI (@ANI) May 31, 2021
दरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ५० लाख ५५ हजार ०५४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५७ लाख ४६ हजार ८९२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात १८ लाख ७० हजार ३०४ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, १० हजार ७४३ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.