Coronavirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९४.२८ टक्के; दिवसभरात ३५ हजार ९४९ जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 09:01 PM2021-06-01T21:01:42+5:302021-06-01T21:06:33+5:30
Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांची संख्येत मोठी घट झाली असून, मंगळावारी दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट असल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबई: राज्यातील जनतेसाठी मोठा दिलासा देणारे वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्येत मोठी घट झाली असून, मंगळावारी दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट असल्याची माहिती मिळाली आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत तब्बल ३५ हजार ९४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९४.२८ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण १४ हजार १२३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 15 077 new corona cases and 35 949 patients have been cured in last 24 hours)
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत १४ हजार १२३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याच कालावधीत ४७७ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच ३५ हजार ९४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५४ लाख ३१ हजार ३१९ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.६७ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण २ लाख ३० हजार ३६७ आहे.
Today, newly 14,123 patients have been tested as positive in the state. Also newly 33,949 patients have been cured today. Totally 54,31,319 patients are cured & discharged from the hospitals. Total Active patients are 2,30,681 The patient recovery rate in the state is 94.28%
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 1, 2021
मुंबईकरांनाही मोठा दिलासा
गेल्या सलग काही दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ८३१ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ५ हजार ८६८ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत २३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १४ हजार ९०७ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे १७ हजार ३२८ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.१५ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ४५३ दिवसांवर गेला आहे.
मोठा दिलासा! कोरोनाच्या उपचारांसाठी दर ठरले; ठाकरे सरकारची अधिसूचनेला मंजुरी
दरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ५२ लाख ७७ हजार ६५३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५७ लाख ६१ हजार ०१५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात १७ लाख ६८ हजार ११९ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ९ हजार ३१५ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.