CoronaVirus: दिलासा! राज्यात ३१ हजार ६७१ जण कोरोनामुक्त; मुंबईत नवे रुग्ण १ हजारांपेक्षा कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 08:37 PM2021-05-28T20:37:49+5:302021-05-28T20:40:37+5:30
CoronaVirus: नव्या कोरोनाबाधितांची संख्येत किंचित घट झाली असली, तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
मुंबई: राज्यातील जनतेसाठी दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्येत किंचित घट झाली असली, तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत तब्बल ३१ हजार ६७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९३.२४ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण २० हजार ७४० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 20 740 new corona cases and 424 deaths in last 24 hours)
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत २० हजार ७४० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ४२४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ३१ हजार ६७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५३ लाख ०७ हजार ८७४ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.६४ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण २ लाख ८९ हजार ०८८ आहे.
“केंद्र सरकार कंपन्यांच्या फायद्यासाठी लसींचा कृत्रिम तुटवडा निर्माण करतंय”
मुंबईकरांनाही मोठा दिलासा
गेल्या सलग ९ दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ९२९ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत १ हजार २३९ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ३० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १४ हजार ८०८ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे २७ हजार ९५८ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.१८ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ३७० दिवसांवर गेला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 28, 2021
२८ मे, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण - ९२९
२४ तासात बरे झालेले रुग्ण - १२३९
बरे झालेले एकूण रुग्ण - ६५८५४०
बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९४%
एकूण सक्रिय रुग्ण- २७९५८
दुप्पटीचा दर- ३७० दिवस
कोविड वाढीचा दर ( २१ मे ते २७ मे)- ०.१८ % #NaToCorona
दरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ४३ लाख ५० हजार १८६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५६ लाख ९२ हजार ९२० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात २१ लाख ५४ हजार ९७६ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, १६ हजार ०७८ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.