CoronaVirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्के; तर दिवसभरात ३४ हजार ३७० जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 09:23 PM2021-05-27T21:23:42+5:302021-05-27T21:25:12+5:30
CoronaVirus: नव्या कोरोनाबाधितांची संख्येत किंचित घट झाली असली, तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
मुंबई: राज्यातील जनतेसाठी दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्येत किंचित घट झाली असली, तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत तब्बल ३४ हजार ३७० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९३.०२ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण २१ हजार २७३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 21 273 new corona cases and 425 deaths in last 24 hours)
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत २१ हजार २७३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ४२५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ३४ हजार ३७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५२ लाख ७६ हजार २०३ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.६३ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण ३ लाख ०१ हजार ०४१ आहे.
Google कडून ७ कोटींचे बक्षीस मिळवण्याची संधी; केवळ ‘हे’ काम करा अन् मालामाल व्हा
COVID19 | 21,273 new cases, 425 deaths and 34,370 discharges reported in Maharashtra today. The recovery rate in the state is 93.02% pic.twitter.com/PqZBl7KfAU
— ANI (@ANI) May 27, 2021
मुंबईकरांनाही दिलासादायक वृत्त
गेल्या सलग ८ दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार २६६ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ८५५ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ३६ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १४ हजार ७७८ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे २८ हजार ३१० उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.१९ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ३५१ दिवसांवर गेला आहे.
नवे नियम सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठीच, युझर्सनी घाबरू नये: रविशंकर प्रसाद
COVID19 | Mumbai reports 1,266 fresh cases, 36 deaths and 855 recoveries today; active cases 28,310. Recovery rate of Mumbai district is 94% pic.twitter.com/3kmGylpTip
— ANI (@ANI) May 27, 2021
‘या’ भागांत एकही मृत्यू नाही
गेल्या २४ तासांत चंद्रपूर शहर, गोंदिया जिल्हा,अमरावती शहर, अकोला शहर, नांदेड शहर, परभणी शहर, हिंगोली, जालना, औरंगाबाद शहर, औरंगाबाद जिल्हा, जळगाव शहर, धुळे शहर, धुळे जिल्हा, मालेगाव शहर, वसई विरार शहर, पालघर जिल्हा, मीरा भायंदर शहर, भिवंडी शहर या ठिकाणी कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही.
गरज असेल तर राज्य सरकार अदर पूनावाला यांना अधिक सुरक्षा देईल: मुंबई हायकोर्ट
दरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ४० लाख ८६ हजार ११० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५६ लाख ७२ हजार १८० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात २२ लाख १८ हजार २७८ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, १९ हजार ९९६ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.