Coronavirus: दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,७८० रुग्ण कोरोनामुक्त; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी २०२३ दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 07:46 PM2021-08-22T19:46:13+5:302021-08-22T19:48:46+5:30

Coronavirus: राज्यातील जनतेसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.

maharashtra reports 4141 new corona cases and 145 deaths in last 24 hours | Coronavirus: दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,७८० रुग्ण कोरोनामुक्त; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी २०२३ दिवसांवर

Coronavirus: दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,७८० रुग्ण कोरोनामुक्त; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी २०२३ दिवसांवर

Next
ठळक मुद्देगेल्या २४ तासांत ४ हजार ७८० रुग्ण कोरोनामुक्त गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ४ हजार १४१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंदमुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी २०२३ दिवसांवर

मुंबई: राज्यातील जनतेसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४ हजार ७८० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ४ हजार १४१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 4141 new corona cases and 145 deaths in last 24 hours) 

“महाराष्ट्रात कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही”; केंद्रीय मंत्र्यांचा दावा

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार १४१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत १४५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४ हजार ७८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ३१ हजार ९९९ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ५३ हजार १८२ इतकी आहे. 

“आता सामनाचे नाव बदलावे आणि पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करावे”; भाजपची टीका

मुंबईकरांना दिलासा

गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ २५९ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत २८१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार ९४६ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे २ हजार ८२५ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०२ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी २०२३ दिवसांवर गेला आहे. दरम्यान, राज्यात ३ लाख १२ हजार १५१ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, २ हजार ५२६ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 

Web Title: maharashtra reports 4141 new corona cases and 145 deaths in last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.