Coronavirus: चिंताजनक! महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ४ हजारांहून अधिक रुग्ण सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 08:16 PM2022-06-16T20:16:43+5:302022-06-16T20:17:11+5:30

कोरोना संक्रमणामुळे राज्यात २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईतील संक्रमण दर १५.११ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

Maharashtra reports 4,255 new COVID19 cases today; Active cases rise to 20,634 | Coronavirus: चिंताजनक! महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ४ हजारांहून अधिक रुग्ण सापडले

Coronavirus: चिंताजनक! महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ४ हजारांहून अधिक रुग्ण सापडले

Next

नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे चौथी लाट आल्याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी पाहून प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ४ हजार २५५ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सध्या २० हजार ६३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मुंबईत २ हजार ३६६ कोरोनाबाधित सापडले आहेत. 

कोरोना संक्रमणामुळे राज्यात २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईतील संक्रमण दर १५.११ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. देशाची राजधानी दिल्लीतही कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. दिल्लीत मागील १० दिवसांत ७ हजार १०० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. कोविड नियमांचे पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून लोकांना केले जात आहे. दिल्लीत ७ जूनला संक्रमण दर १.९२ टक्के होता तो वाढून आता ७.०१ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. 

केरळमध्ये बुधवारी कोरोनाचे ३ हजार ४१९ नवीन रुग्ण आढळले. केरळमध्ये १८ गजार ३४५ सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत ६९ हजार ८५३ लोकांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे लोकांना मास्क घालणे, कोविड नियम पाळणे गरजेचे आहे असं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मागील २४ तासांत देशात कोरोनामुळे ११ मृत्यू झालेत. ज्यात केरळमधील ३  आणि महाराष्ट्रातील २ मृत्यूंचा समावेश आहे. 



 

महाराष्ट्रात कुठे अन् किती सक्रीय रुग्ण ?
मुंबई - १३००५
ठाणे - ३९७८
पालघर - ६२५
रायगड -७०९
रत्नागिरी - ४२
सिंधुदुर्ग - ३७
पुणे - १४३५
सातारा - १६
नाशिक - १०८
अहमदनगर - ५०
जळगाव - १७
औरंगाबाद - २४
लातूर - ४१
अमरावती - १७
अकोला - २५
वाशिम - २२
 

Web Title: Maharashtra reports 4,255 new COVID19 cases today; Active cases rise to 20,634

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.