Coronavirus: काहीसा दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,३४२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ५५ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 08:30 PM2021-09-02T20:30:11+5:302021-09-02T20:32:04+5:30
Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे.
मुंबई: राज्यातील जनतेसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४ हजार ७५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७.०४ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ४ हजार ३४२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 4342 new corona cases and 55 deaths in last 24 hours)
TATA चा धुमाकूळ! ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत नोंदवली ५३ टक्के वाढ; बड्या कंपन्यांना धोबीपछाड
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ३४२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ५५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४ हजार ७५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ८१ हजार ९८५ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ५० हजार ६०७ इतकी आहे.
जबरदस्त! UPI द्वारे ऑगस्टमध्ये ३.५५ अब्जांचे व्यवहार; ९.५६ टक्क्यांची वाढ PhonePe आघाडीवर
मुंबईकरांच्या चिंतेतही काहीशी भर
गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ४४१ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत २०५ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार ९८४ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे ३ हजार ४१८ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०५ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी १४४६ दिवसांवर गेला आहे.
TATA ग्रुपचा मोदी सरकारला पाठिंबा; एलन मस्कच्या ‘त्या’ मागणीला केला जोरदार विरोध
Mumbai reported 441 new #COVID19 cases, 205 discharges and 3 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) September 2, 2021
Active cases 3418
A total of 47 buildings have been sealed so far in Mumbai, including 15 buildings in the last 24 hours. pic.twitter.com/1EoXLnkG8d
दरम्यान, आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४३ लाख २७ हजार ४६९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ७३ हजार ६७४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच राज्यात २ लाख ८७ हजार ३८५ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, १ हजार ९७१ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. मालेगाव, धुळे, जालना, हिंगोली, नांदेड, वाशिम, या पाच जिल्ह्यात शून्य रुग्ण आढळले आहेत.