Coronavirus: चिंता कायम! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६६६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १३१ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 09:46 PM2021-08-29T21:46:53+5:302021-08-29T21:48:36+5:30

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना पाहायाला मिळत आहे.

maharashtra reports 4666 new corona cases and 131 deaths in last 24 hours | Coronavirus: चिंता कायम! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६६६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १३१ जणांचा मृत्यू

Coronavirus: चिंता कायम! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६६६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १३१ जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देगेल्या २४ तासांत ३ हजार ५१० रुग्ण कोरोनामुक्तगेल्या २४ तासांत राज्यात एकूण ४ हजार ६६६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंदयाच कालावधीत १३१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई: राज्यातील जनतेसाठी काहीसे चिंताजनक असे वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना पाहायाला मिळत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ३ हजार ५१० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ४ हजार ६६६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 4666 new corona cases and 131 deaths in last 24 hours)

“आता पळपुटेपणा न करता हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा”; नितेश राणेंचा टोला

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ६६६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत १३१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ३ हजार ५१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ६३ हजार ४१६ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ५२ हजार ८४४ इतकी आहे. 

“योग्य वेळ आली की सीडी लावणार”; एकनाथ खडसेंनी दिला थेट इशारा

मुंबईकरांच्या चिंतेतही काहीशी भर 

गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ३४५ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत २८० रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत २ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार ९७४ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे ३ हजार ०३६ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०४ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी १६११ दिवसांवर गेला आहे. 

वेगात वाढ व वेळेची बचत होणार! रेल्वे ८ हजार ट्रेनच्या वेळा बदलणार, IIT मुंबईची घेणार मदत

दरम्यान, आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ३६ लाख ५९ हजार ६१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ५६ हजार ९३९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच राज्यात २ लाख ९१ हजार ५२२ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, २ हजार ३१५ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. जालना, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया या पाच जिल्ह्यात शून्य रुग्ण आढळले आहेत.
 

Web Title: maharashtra reports 4666 new corona cases and 131 deaths in last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.