Coronavirus: चिंतेत भर! राज्यात गेल्या २४ तासांत ५,०३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; २१६ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 09:37 PM2021-08-25T21:37:46+5:302021-08-25T21:40:16+5:30
Coronavirus: राज्यातील जनतेसाठी काहीसे चिंताजनक असे वृत्त आहे.
मुंबई: राज्यातील जनतेसाठी काहीसे चिंताजनक असे वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४ हजार ३८० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७.०४ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ५ हजार ०३१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 5031 new corona cases and 216 deaths in last 24 hours)
मोदी सरकारकडून आता कोकण रेल्वेचे खासगीकरण? ७२८१ कोटींचा निधी उभारणार
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार ०३१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत २१६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४ हजार ३८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ४७ हजार ४१४ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ५० हजार १८३ इतकी आहे.
Maharashtra reports 5,031 fresh COVID cases, 4,380 recoveries, and 216 deaths today
— ANI (@ANI) August 25, 2021
Active cases: 50,183
Total recoveries: 62,47,414
Death toll: 1,36,571 pic.twitter.com/5TmnuzpSVV
मुंबईकरांच्या चिंतेतही काहीशी भर
गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ३४३ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत २७२ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार ९५६ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे २ हजार ८५५ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०४ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी १८८४ दिवसांवर गेला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 25, 2021
25th August, 6:00pm#NaToCoronapic.twitter.com/po8c6my5oK
दरम्यान, आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी २८ लाख ४० हजार ८०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ३७ हजार ६८० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच राज्यात २ लाख ९८ हजार २६४ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, २ हजार २६९ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील पाच जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली नाही. धुळे, नंदुरबार, वाशिम, भंडारा, गोंदिया या पाच जिल्ह्यात शून्य रुग्ण आढळले आहेत.