CoronaVirus News in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, दिवसभरात 55 हजार 469 नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 10:00 PM2021-04-06T22:00:31+5:302021-04-06T22:17:56+5:30
CoronaVirus News in Maharashtra : मंगळवारी राज्यात दिवसभरात 55 हजार 469 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
मुंबई : राज्यात आज कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 55 हजार 469 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 34 हजार 256 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 297 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात काल कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे. मात्र, पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे राज्याची चिंता अद्याप कायम आहे. (Maharashtra reports 55,469 new COVID cases, 34,256 recoveries, and 297 deaths in the last 24 hours)
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी राज्यात दिवसभरात 55 हजार 469 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 34 हजार 256 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.98% एवढे झाले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 25,83,331 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. तसेच, आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2,09,17,486 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 31,13,354 (14.88 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 24,55,498 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 22,797 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Maharashtra reports 55,469 new COVID cases, 34,256 recoveries, and 297 deaths in the last 24 hours
— ANI (@ANI) April 6, 2021
Total cases: 31,13,354
Active cases: 4,72,283
Total recoveries: 25,83,331
Death toll: 56,330 pic.twitter.com/j1PTwmpK1E
मुंबईने कोरोना रुग्णसंख्येत 10 हजाराचा टप्पा ओलांडला!
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.गेल्या 24 तासांत मुंबईत तब्बल 10 हजार 30 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्येचा एका दिवसातील हा सर्वाधिक आकडा आहे. तसेच, मुंबई शहरातील रुग्ण बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 81 टक्क्यांवर आले आहे. तर आतापर्यंत 3 लाख 82 हजार 4 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग आता 38 दिवसांवर आला आहे. 30 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान कोरोना रुग्ण वाढीचा दर 1.79 टक्के इतका नोंदविण्यात आला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 6, 2021
6-Apr; 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 10,030
Discharged Pts. (24 hrs) - 7,019
Total Recovered Pts. - 3,82,004
Overall Recovery Rate - 81%
Total Active Pts. - 77,495
Doubling Rate - 38 Days
Growth Rate (30 Mar-5 Apr) - 1.79%#NaToCorona
("25 वर्षांवरील सर्वांना लस द्या", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विनंती)
25 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे - राजेश टोपे
"केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज विविध राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत राज्यांमधील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे.त्यामुळे केंद्र शासनाने मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा. 25 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे, महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश देणेबाबत विनंती केली. यावेळी राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते", अशी माहिती टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.