सावधान! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ, एकूण रुग्णसंख्या ३ हजार पार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 07:50 PM2023-03-30T19:50:15+5:302023-03-30T19:52:14+5:30
कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे.
मुंबई-
कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ६९४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ३,०१६ इतकी झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत १८४ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. तर रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण ९८.१४ टक्के इतकं आहे. राज्यात कोरोना, एच१ एन१, एच३ एन२ आणि इन्फ्लूएन्झा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
COVID-19 | Maharashtra reports 694 new cases in the state today. No covid death.
— ANI (@ANI) March 30, 2023
Active cases at 3,016. pic.twitter.com/4nfiD4NcCD
मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे टाळा
राज्यात सध्या हंगामी साथीच्या आजाराची लक्षणेही रुग्णांमध्ये दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, मास्क वापरा, दोन व्यक्तींमध्ये योग्य अंतर ठेवा, हात सॅनिटायझरने स्वच्छ ठेवा, गर्दीची ठिकाणे टाळा, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
ऑक्सिजनचा पुरेसा साठा
राज्यात ५२३ ऑक्सिजन प्लांट असून ५५२ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती केली जाऊ शकते. ३७० एमएलडी लिक्विड ऑक्सिजन टँक, ५६ हजार ५५१ जम्बो सिलिंडर, २० हजार छोटे सिलिंडर्स, १ हजार ड्युरा सिलिंडर्स आहेत. उपचारांसाठी १ हजार ५८८ कोरोना रुग्णालये आहेत. विलगीकरण खाटा ५१ हजार ३६५, ऑक्सिजन बेड ४९ हजार ३९६, आयसीयू बेड १४ हजार ३९५, तर व्हेंटिलेटर बेड ९ हजार २३६ आहेत.