Coronavirus: दिलासा! राज्यात १३ हजार ४५२ रुग्ण कोरोनामुक्त; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ९५१ दिवसांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 09:10 PM2021-07-16T21:10:14+5:302021-07-16T21:12:21+5:30
Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
मुंबई: राज्यातील जनतेसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १३ हजार ४५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९६.२७ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ७ हजार ७६१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 7761 new corona cases and 167 deaths in last 24 hours)
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ७ हजार ७६१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याच कालावधीत १६७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, १३ हजार ४५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख ६५ हजार ६४४ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण १ लाख ०१ हजार ३३७ इतकी आहे.
Monorail चे खासगीकरण होणार? खर्चात मोठी वाढ; MMRDA कडून मोर्चेबांधणीला सुरुवात!
मुंबईकरांना काहीसा दिलासा
गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या १५ हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ४४६ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ४७० रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ११ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार ६७८ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे ६ हजार ९७३ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०७ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी ९५१ दिवसांवर गेला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 16, 2021
१६ जुलै, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना#NaToCoronapic.twitter.com/EuEhW5ugHh
दरम्यान, राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १७ हजार ०९६ इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात एकूण १५ हजार ८२६ इतके रुग्ण आहेत.