Coronavirus: राज्याचा रिकव्हरी रेट ९५.७६ टक्के; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ७२० दिवसांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 10:21 PM2021-06-19T22:21:04+5:302021-06-19T22:22:46+5:30
Coronavirus: नवीन कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पुन्हा वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई: राज्यातील जनतेसाठी दिलासादायक वृत्त आहे. नवीन कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पुन्हा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १० हजार ३७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९५.७६ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण ८ हजार ९१२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 8912 new corona cases and 257 deaths in last 24 hours)
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत ८ हजार ९१२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत २५७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच १० हजार ३७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५७ लाख १० हजार ३५६ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.९७ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण १ लाख ३२ हजार ५९७ इतकी आहे.
Maharashtra reports 8912 new COVID cases, 10,373 patient discharges, and 257 deaths in the past 24 hours
— ANI (@ANI) June 19, 2021
Active cases: 1,32,597
Total discharges: 57,10,356
Death toll: 1,17,356 pic.twitter.com/4yJyJzh7wD
मुंबईकरांना दिलासा
मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ६९६ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ७९० रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत १३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार २७९ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे १४ हजार ७५१ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.९ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ७२० दिवसांवर गेला आहे.
Mumbai reports 696 new COVID cases, 790 discharges, and 13 deaths in the past 24 hours
— ANI (@ANI) June 19, 2021
Active cases: 14,751
Total discharges: 6,88,340
Death toll: 15,279 pic.twitter.com/CxlyPf1RHW
दरम्यान, राज्यामध्ये एकूण ३ कोटी ९३ लाख १२ हजार ९२० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५९ लाख ६३ हजार ४२० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात ८ लाख ०६ हजार ५०६ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ४ हजार ६९५ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.