Coronavirus: दिलासा! राज्यात २४ तासांत १० हजार ४५८ जण कोरोनामुक्त; ३६ जिल्हा-मनपांमध्ये एकही मृत्यू नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 09:42 PM2021-07-09T21:42:11+5:302021-07-09T21:44:14+5:30
Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
मुंबई: राज्यातील जनतेसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १० हजार ४५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९६.०८ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण ०८ हजार ९९२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 8992 new corona cases and 200 deaths in last 24 hours)
देशात अद्याप कोरोनाची दुसरी लाट कायम; महाराष्ट्र, केरळमध्ये ५३ टक्के रुग्ण
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ०८ हजार ९९२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत २०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच १० हजार ४५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख ४४० रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.०३ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण १ लाख १२ हजार २३१ आहे. राज्यातील ३६ जिल्हा-मनपांमध्ये गेल्या २४ तासांत एकही कोरोना मृत्यूची नोंद करण्यात आली नसल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra | 8,992 new COVID19 cases, 200 deaths and 10,458 patients discharged today; active cases in the state are 1,12,231 pic.twitter.com/fnaYAQ5L34
— ANI (@ANI) July 9, 2021
मुंबईकरांना काहीसा दिलासा
गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या १५ हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ६०० नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ५६६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत १३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार ५९९ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे ७ हजार ७३१ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०७ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी ८९२ दिवसांवर गेला आहे.
Mumbai reports 600 new COVID19 cases and 13 deaths; active cases at 7,731 pic.twitter.com/RVvYn7Kreg
— ANI (@ANI) July 9, 2021
दरम्यान, राज्यात एकूण ४ कोटी ३५ लाख ६५ हजार ११९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६१ लाख ४० हजार ९६८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात ६ लाख २७ हजार ४२३ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ४ हजार ७५६ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.