Coronavirus: दिलासा! राज्यात मृत्यूसंख्येत घट, रिकव्हरी रेट ९५.७३ टक्के; १४ हजार ३४७ जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 09:13 PM2021-06-18T21:13:03+5:302021-06-18T21:14:34+5:30
Coronavirus: नवीन कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पुन्हा वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई: राज्यातील जनतेसाठी दिलासादायक वृत्त आहे. नवीन कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पुन्हा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १४ हजार ३४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९५.७३ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण ९ हजार ७९८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 9798 new corona cases and 198 deaths in last 24 hours)
“कोरोनाची तिसरी लाट अधिक दूर नाही”; हायकोर्टाची केंद्र सरकारला नोटीस
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत ९ हजार ७९८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत १९८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच १४ हजार ३४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ९९ हजार ९८३ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.९६ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण १ लाख ३४ हजार ७४७ इतकी आहे.
Maharashtra reports 9,798 new COVID cases, 14,347 patient discharges, and 198 deaths in the past 24 hours
— ANI (@ANI) June 18, 2021
Active cases: 1,34,747
Total discharges: 56,99,983
Death toll: 1,16,674 pic.twitter.com/LcJdXJnsTA
मुंबईकरांना दिलासा
मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ७६२ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ६८४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत १९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार २६६ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे १४ हजार ८६० उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.९ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ७३४ दिवसांवर गेला आहे.
Mumbai reports 762 new COVID cases, 684 discharges, and 19 deaths in the past 24 hours
— ANI (@ANI) June 18, 2021
Active cases: 14,860
Total discharges: 6,87,550
Death toll: 15,266 pic.twitter.com/YSrjBeHAuq
दरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ९० लाख ७८ हजार ५४१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५९ लाख ५४ हजार ५०८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात ८ लाख ५४ हजार ४६१ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ४ हजार ८३१ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.