Maharashtra: निवासी डॉक्टरांचा संप मागे,दोन दिवसात दीड हजार पदे भरणार
By बाळकृष्ण दोड्डी | Published: January 3, 2023 09:08 PM2023-01-03T21:08:06+5:302023-01-03T21:08:35+5:30
Maharashtra: दोन दिवसात निवासी डॉक्टरांची १४३२ रिक्त पदे भरणार असल्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी दिले आहे.
- बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : दोन दिवसात निवासी डॉक्टरांची १४३२ रिक्त पदे भरणार असल्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी दिले आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी पुकारलेला बेमुदत संप मागे घेत असल्याची माहिती सोलापूर निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. विकास काटारे यांनी दिली.
बुधवार, ४ जानेवारी पासून निवासी डॉक्टर पूर्ववत सेवा बजावतील, असेही त्यांनी सांगितले. संपाच्या पार्श्वभूमीवर मंत्री महाजन यांनी निवासी डॉक्टरांची मुंबई बैठक घेतली. यात सकारात्मक निर्णय झाला असून बैठकीनंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला.
१,४३२ एसआर पदांची निर्मिती करा, वसतिगृहांची दुरवस्था झाली असून, वसतिगृहांची क्षमता वाढवा, महागाई भत्ता पाचव्या वेतन आयोगानुसार चालू आहे, ती थांबवून सातव्या वेतन आयोगानुसार अदा करा, सहयोगी तसेच सहायक प्राध्यापकांची रिक्त पदे तत्काळ भरा, यासह इतर मागण्यांकरिता निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले.