रूग्णांच्या मदतीला महाराष्ट्र धावला : पहिल्याच दिवशी ५ हजार लाेकांचे रक्तदान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 07:08 AM2021-07-03T07:08:32+5:302021-07-03T07:08:54+5:30
आज महाराष्ट्रात ९६ शिबिरांमधून ५ हजाराहून जास्त युनिट रक्त गोळा झाले आहे..!
आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधीकडून
मुंबई/नागपूर/औरंगाबाद : एक जुलै रोजी महाराष्ट्रात फक्त १९ हजार युनिट रक्त शिल्लक होते. मात्र लोकमत रक्तदान मोहिमेअंतर्गत पहिल्याच दिवशी म्हणजे २ जुलै रोजी तब्बल पाच हजार युनिट रक्त गोळा झाले आहे. महाराष्ट्रातील जनतेने दिलेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. संकट काळात धावून जाण्याची महाराष्ट्राची परंपरा या मोहिमेत लोकमतवर प्रेम करणाऱ्या वाचकांनी तेवत ठेवली आहे. आज महाराष्ट्रात ९६ शिबिरांमधून ५ हजाराहून जास्त युनिट रक्त गोळा झाले आहे..!
नागपूर : संकटकाळी रक्ताचे नाते मजबूत करा : उर्जामंत्री
लोकमतच्या वतीने स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयाेजित रक्तदान महायज्ञाचा शुभारंभ शुक्रवारी नागपुरातील स्व. जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत राज्याचे ऊर्जा व पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आ. विकास ठाकरे, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, महापौर दयाशंकर तिवारी, खा. डॉ. विकास महात्मे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, मनपा आयुक्त बी. राधाकृष्णन, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, लाईफ लाईन ब्लड बॅंकेचे संचालक डॉ. हरीश वरभे, लोकमत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, डागा हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर, माजी आ. यादवराव देवगडे, उन्नती फाऊंडेशनचे प्रमुख अतुल काेटेचा, लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा व कार्यकारी संचालक करण दर्डा उपस्थित होते.
औरंगाबाद : सामाजिक बांधिलकीशी लाेकमतचे अतुट नाते : आराेग्यमंत्री
‘लोकमत रक्ताचं नातं’ या महारक्तदान शिबिराचा दीप प्रज्वलन करून शुभारंभ करताना ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे. याप्रसंगी उपस्थित (डावीकडून) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर, पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता, श्री ओम स्टीलचे सीईओ नितीन भारुका, विक्रम टी प्रोसेसर प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक शुभम पटेल.