महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण : छगन भुजबळ यांना 6 ऑगस्टपर्यंत दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 05:30 PM2018-06-27T17:30:53+5:302018-06-27T17:31:27+5:30

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे.

Maharashtra Sadan scam case: Chagan Bhujbal consoled till August 6 | महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण : छगन भुजबळ यांना 6 ऑगस्टपर्यंत दिलासा

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण : छगन भुजबळ यांना 6 ऑगस्टपर्यंत दिलासा

Next

मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना विशेष पीएमएलए कोर्टाने भुजबळ यांना 6 ऑगस्टपर्यंत अटक करू, नये असा निर्णय दिला आहे. तसेच पर्सनल बाँड भरण्याचे आदेश भुजबळ यांना दिले आहेत.  
दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरण आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून दोन वर्षांपासून अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना चार मे रोजी जामीन मंजूर करण्यात आला होता. ५ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली होती. 
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुमारे दहा तास कसून चौकशी केल्यानंतर १४ मार्च २०१६ रोजी छगन भुजबळ यांना अटक केली होती आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. सुमारे १०० कोटी रुपये खर्चून दिल्लीत बांधलेल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) भुजबळ यांच्यासह पंकज, समीर आणि अन्य १४ जणांवर आधीच आरोपपत्र दाखल केले होतं. या प्रकरणाची चौकशी पुढे नेत, भुजबळ कुटुंबाच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे सरकारी तिजोरीचे ८७० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं ‘ईडी’नं म्हटलं होतं आणि छगन भुजबळ यांना अटक केली होती. 

Web Title: Maharashtra Sadan scam case: Chagan Bhujbal consoled till August 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.