महाराष्ट्र सदन घोटाळा, माहिती आयुक्त दीपक देशपांडेंच्या घराची झाडाझडती

By admin | Published: June 14, 2015 12:40 PM2015-06-14T12:40:29+5:302015-06-14T15:00:16+5:30

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रविवारी आजी - माजी सनदी अधिका-यांच्या घरांची झाडाझडती घेतली आहे.

Maharashtra Sadan scam, Information Commissioner Deepak Deshpande's house, Jharkhand | महाराष्ट्र सदन घोटाळा, माहिती आयुक्त दीपक देशपांडेंच्या घराची झाडाझडती

महाराष्ट्र सदन घोटाळा, माहिती आयुक्त दीपक देशपांडेंच्या घराची झाडाझडती

Next

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. १४ - महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रविवारी आजी - माजी सनदी अधिका-यांच्या घरांची झाडाझडती घेतली आहे.राज्याचे माहिती आयुक्त व तत्कालीन स्वीय सहाय्यक दीपक देशपांडे, बांधकाम विभागाचे माजी सचिव देवदत्त मराठे यांच्या घरांवर एसीबीने छापा टाकत महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहे. 

महाराष्ट्र सदनातील कंत्राटातील भ्रष्टाचाराप्रकरणी एसीबीने छगन भुजबळ व अन्य १७ जणांवर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला होता. एसीबीने याप्रकरणी आता बांधकाम विभागातील तत्कालीन अधिका-यांची झाडाझडती घ्यायला सुरुवात केली आहे. यानुसार रविवारी देवदत्त मराठे व दीपक देशपांडे यांच्या घराची झडती घेण्यात आली. देशपांडे यांच्या घरातून १ कोटींची ठेवी, ८० तोळे सोने व अन्य महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.  या अधिका-यांची बँक खातीही सील केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 

Web Title: Maharashtra Sadan scam, Information Commissioner Deepak Deshpande's house, Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.