Maharashtra School Reopen: राज्यातील शाळा लवकरच सुरू होणार, आदित्य ठाकरेंनी दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 07:17 PM2022-01-19T19:17:24+5:302022-01-19T19:18:29+5:30
Maharashtra School Reopen: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात दिवसाला मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यातील शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
Maharashtra School Reopen: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात दिवसाला मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यातील शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. पण आता शाळा सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यातील शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला असल्याचं सांगितलं जात आहे. आता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही शाळा पुन्हा सुरू होण्याचे संकेत दिले आहेत.
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मुंबई महापालिका आणि कोविड टास्क फोर्ससोबत आदित्य ठाकरे यांची बैठक आज पार पडली. यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला तसंच शाळा सुरू करण्याबाबतच्या मुद्द्यावरही चर्चा झाली आहे. तसंच बैठकीत १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबतचा आढावा घेण्यात आला.
In a review meeting this morning with @mybmc and experts of State Task Force for covid, we reviewed the vaccination status for 15-18 yr olds, along with our preparedness for safe re-opening of educational institutes at the earliest possible,now that cases are steadily declining.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 19, 2022
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
"मुंबई महापालिका आणि राज्याच्या कोविड टास्क फोर्ससोबत आज आढावा बैठक घेण्यात आली. यात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या कोरोना विरोधी लसकरण तसंच शाळा पुन्हा सुरू करण्याबाबतची तयारीचा आढावा घेण्यात आला. आता रुग्णसंख्येत देखील घट होताना दिसत आहे", असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.