"आई-बाबा म्हणाले, वाईट एकाच गोष्टीचं वाटतं..," आदित्य ठाकरेंनी सांगितली ‘वर्षा’ची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 10:03 PM2022-06-25T22:03:20+5:302022-06-25T22:03:27+5:30

आठवण सांगताना आदित्य ठाकरे झाले भावूक.

maharashtra shiv sena leader aditya thackeray speaks on maharashtra political crisis uddhav thackeray rashmi thackeray varsha bungalow | "आई-बाबा म्हणाले, वाईट एकाच गोष्टीचं वाटतं..," आदित्य ठाकरेंनी सांगितली ‘वर्षा’ची आठवण

"आई-बाबा म्हणाले, वाईट एकाच गोष्टीचं वाटतं..," आदित्य ठाकरेंनी सांगितली ‘वर्षा’ची आठवण

googlenewsNext

राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर जोरदार निशाणा साधत शिवसेनेतून आता घाण निघून गेली, आता संगळं चांगलंच होणार असं वक्तव्य केलं. शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी एक हळवी आठवणही सांगितली.

“परवा जेव्हा ते फेसबुक लाईव्ह करत होते, तेव्हा त्यांनी मला सांगितलं आदित्य मला एका गोष्टीचं वाईट वाटतं, आईदेखील तेच बोलली, वर्षा बंगल्याचा कोणाला मोह नसतो. इतर कोणाचं माहित नाही. आधीही पुन्हा येईन, पुन्हा येईन चालायचं. भिंतीवर कोणी काही लिहून ठेवलेलं. जेव्हा उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह करत होते, त्याला काही तांत्रिक कारणामुळे वेळ झाला. तेव्हाच काय झालं माहित नाही, त्यांनी आम्हाला सांगितलं बॅगा बांधा. आपण निघतोय, मी म्हटलं असा मुख्यमंत्री ज्यांना मोह नाही तो कधी मिळणार,” असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

बंडखोरांवर निशाणा
सगळी आपल्या जवळची माणसं, प्रेमाची माणसं निघून जातात तेव्हा आपलं काय चुकलं याचं दु:ख होतं. मी ३२ वर्षांचा माणूस राजकारणात आहे हे चुकलंय का? राजकारणाची पातळी खाली जातेय हे पाहून मी कोणाला कोणत्या तोंडानं सांगू राजकारणात या. वर्षाकडून मातोश्रीकडून येताना आम्हाला तुमचं प्रेम दिसलं. तुम्ही या जमा असं काही ठरलंही नव्हतं. आमच्या डोळ्यात अश्रू होते, काही पोलिसांच्या, सीएमओच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातही अश्रू होते हे पाहिलं असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले.

Web Title: maharashtra shiv sena leader aditya thackeray speaks on maharashtra political crisis uddhav thackeray rashmi thackeray varsha bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.