मद्यप्रेमींसाठी New Year घेऊन येणार आनंदाची बातमी; दारुच्या दरात कमालीची घट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 12:41 PM2021-12-17T12:41:09+5:302021-12-17T12:41:40+5:30

उत्पादन शुल्क विभागाने नियम बदलल्यामुळे काही ब्रँडचे दर कमी झाले आहेत.

Maharashtra slashes excise duty on liquor check latest alcohol prices here new year | मद्यप्रेमींसाठी New Year घेऊन येणार आनंदाची बातमी; दारुच्या दरात कमालीची घट

मद्यप्रेमींसाठी New Year घेऊन येणार आनंदाची बातमी; दारुच्या दरात कमालीची घट

googlenewsNext

विशेष उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात करण्याची राज्य सरकारने नुकतीच घोषणा केली होती. उत्पादन शुल्क विभागाने नियम बदलल्यामुळे काही ब्रँडचे दर कमी झाले आहेत. व्हिस्की, रम, ब्रँडी, जिन आणि वोडकासाठी उत्पादन शुल्कात ही कपात लागू झाली आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने नव्या वर्षासाठी नवे मद्याचे दर जाहीर केले आहेत.

पण नव्या वर्षाच्या आधीच हा नवा साठा दुकानांमध्ये विक्रीसाठी आल्यास ख्रिसमस व नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मद्यप्रेमींना दारू स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकेल. राज्यात शुल्क कपात लागू झाली असली तरी दुकानातील मद्याचा जुना साठा असल्याचे तो जुन्या किमतीला विकला जात आहे. त्यामुळे स्वस्त दरात दारू उपलब्ध झालेली नाही. मात्र येत्या काही दिवसांमध्ये दारूच्या दुकानांमध्ये नवा साठा नव्या किमतीसह उपलब्ध होणार आहे. 

व्हिस्कीचे नवीन दर ७५० एमएलसाठी
मॅकडॉवल नं १ ६०० रुपये
इम्पेरियल ब्ल्यू ६०० रुपये
रॉयल स्टॅग ६८० रुपये
बॅगपायपर ५२० रुपये
डीएसपी ब्लॅक ५६० रुपये
ब्लेंडर्स प्राइड १३०० रुपये
रॉयल चॅलेंज ८४० रुपये
अँटीक्विटी ब्ल्यू १४०० रुपये
सिग्नेचर १३०० रुपये
रॉकफोर्ड रिसर्व १५०० रुपये
ब्लॅक अँड व्हाईट २५०० रुपये
१०० पायपर्स २५०० रुपये
जिम बिम २७६० रुपये
जॅक डॅनीयल्स ४४५० रुपये

Web Title: Maharashtra slashes excise duty on liquor check latest alcohol prices here new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.