टोलमाफी, २ नदीजोड प्रकल्पांना मंजुरीसह राज्य मंत्रिमंडळाने घेतले १९ मोठे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 12:37 PM2024-10-14T12:37:51+5:302024-10-14T12:39:55+5:30

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ असं नामकरण करण्यात मंजुरी देण्यात आली आहे. 

Maharashtra State Cabinet took 19 major decisions including approval of Mumbai Entry Point toll waiver, 2 river linking projects, Under CM Eknath Shinde Meeting | टोलमाफी, २ नदीजोड प्रकल्पांना मंजुरीसह राज्य मंत्रिमंडळाने घेतले १९ मोठे निर्णय

टोलमाफी, २ नदीजोड प्रकल्पांना मंजुरीसह राज्य मंत्रिमंडळाने घेतले १९ मोठे निर्णय

मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकते, त्याआधी राज्य सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासे देणारे महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात येत आहे. सोमवारी १४ ऑक्टोबरला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतील एन्ट्री पाँईटवरील पाचही टोलनाक्यावर हलक्या वाहनांना आजपासून टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच राज्यातील दोन नदीजोड प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथं राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारकडून विविध घोषणा केल्या जात आहेत. आजच्या बैठकीत आगरी समाजासाठीही महामंडळाची घोषणा करण्यात आली. त्याशिवाय हायब्रीड स्कील विद्यापाठीसाठी महसूल विभागातून खिडकाळी येथे विनामूल्य जमीन देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले महत्त्वाचे १९ निर्णय

१) मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्री १२ वाजेपासून अंमलबजावणी.

२) आगरी समाजासाठी महामंडळ

३) समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम

४) दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता

५) आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता

६) वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता

७) राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

८) पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी

९) खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य

१०) राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

११) पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता

१२) किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ

१३) अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ

१४) मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे

१५) खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना

१६) मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा

१७) अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट

१८) ‘उमेद’साठी अभ्यासगट

१९) कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव

Read in English

Web Title: Maharashtra State Cabinet took 19 major decisions including approval of Mumbai Entry Point toll waiver, 2 river linking projects, Under CM Eknath Shinde Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.