सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 05:57 AM2024-06-01T05:57:16+5:302024-06-01T05:59:22+5:30

एसटीची पहिली बस १ जून १९४८ रोजी पुणे-अहमदनगर मार्गावर धावली होती

Maharashtra State Transport Bus Service became 76 years old today ST stands will be decorated with rangoli on the occasion of birthday | सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार

सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पुणे-अहमदनगर मार्गावर एसटीची पहिली बस १ जून १९४८ रोजी धावली. त्या निमित्ताने १ जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जात असून, १ जून रोजी एसटीच्या सर्व बस स्थानकांवर प्रवासी व सर्व कर्मचारी बांधवांना साखर पेढे वाटून शुभेच्छा देण्यात येणार आहेत. वर्धापन दिनानिमित्त सर्व बसस्थानके रांगोळी काढून, फुला-पानांचे तोरणे बांधून सजविण्यात येणार आहेत.

एसटीची सेवा राज्यात देण्यासाठी ८७ हजार कर्मचारी व अधिकारी काम करत आहेत. ३६ बेडफोर्ड बसवर सुरू झालेला हा प्रवास ७६ वर्षांत १५ हजार बसपर्यंत पोहोचला आहे. बसच्या माध्यमातून ५६० पेक्षा जास्त बस स्थानकावरून  दररोज सरासरी ५५ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते.

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी अशा ३० पेक्षा जास्त समाज घटकांना एसटीच्या प्रवासीसेवेमध्ये ३३ टक्क्यांवरून १०० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते.

चांदा ते बांदापर्यंत दिली सेवा

गेल्या ७६ वर्षांत एसटी संकटावर मात करत राज्याच्या डोंगरदऱ्यातील वाड्या वस्त्यांपासून आदिवासी पाड्यापर्यंत दळणवळण सेवा देत आहे. गणेशोत्सव, दिवाळी, आषाढी, कार्तिर्की यात्रा अशा अनेक सण आणि उत्सवाच्या निमित्ताने नियमित फेऱ्यांबरोबरच विशेष फेऱ्या सोडून एसटी प्रवाशांबरोबरच भाविक प्रवाशांची सोय करते. शालेय सहली, लग्न समारंभ, विविध शासकीय महोत्सव, मेळावे यासाठीही एसटी सेवा देत आहे.

Web Title: Maharashtra State Transport Bus Service became 76 years old today ST stands will be decorated with rangoli on the occasion of birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.