प्रदूषणामुळे महाराष्ट्राचा श्वास कोंडलेलाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 07:05 AM2021-03-07T07:05:02+5:302021-03-07T07:08:30+5:30

मानके पूर्ण न करणारी सर्वाधिक शहरे राज्यात; मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरारचा समावेश

Maharashtra suffocates due to pollution! | प्रदूषणामुळे महाराष्ट्राचा श्वास कोंडलेलाच!

प्रदूषणामुळे महाराष्ट्राचा श्वास कोंडलेलाच!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमानुसार (एनसीएपी) प्रदूषणाची मानके पूर्ण न करणारी महाराष्ट्रात सर्वाधिक १८ शहरे आहेत. २०१७ ची प्रदूषण पातळी विचारात घेऊन या शहरांनी २०-३० टक्के प्रदूषण पातळी कमी करायची आहे. हवेच्या गुणवत्तेची राष्ट्रीय मानके सलग पाच वर्षे पूर्ण न करू 
शकणाऱ्या शहरांचा यात समावेश केला जातो.

प्रदूषणाची मानके पूर्ण न करणाऱ्यांमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर, चंद्रपूर, औरंगाबाद, आदी शहरांचा समावेश होतो. वसई-विरार महापालिका क्षेत्राचा यात अगदी अलीकडे समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील वायू प्रदूषणात सर्वाधिक वाटा वाहने, उद्योग आणि बांधकाम क्षेत्र (औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसह) तसेच इंधनामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा आहे. 

पल्माेकेअर रिसर्च ॲण्ड  एज्युकेशन फाउंडेशन, पुणे येथील  डाॅ. संदीप साळवी यांनी सांगितले  की, वायुप्रदूषणाचे आर्थिक परिणामही होतात. वायुप्रदूषणामुळे अवेळी होणाऱ्या मृत्यूंमुळे देशाला २ लाख ८० हजार कोटींचे नुकसान सोसावे लागते. हे प्रमाण देशाच्या एकूण उत्पन्नाच्या १.३६ टक्के आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत हेच प्रमाण १.१ टक्के आहे.

Web Title: Maharashtra suffocates due to pollution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.