रोलबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघ प्रथम
By admin | Published: January 14, 2015 08:54 PM2015-01-14T20:54:31+5:302015-01-14T23:42:12+5:30
छत्तीसगड स्पर्धा : मध्यप्रदेश, गुजरात, बिहारला नमविले
सातारा : जगदलपुर (छत्तीसगड) येथे झालेल्या ६० व्या राष्ट्रीय शालेय रोलबॉल स्पर्धेत १४ व १७ वर्षाखालील मुला-मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने प्रथम क्रमांक मिळविला. महाराष्ट्र संघातून खेळलेल्या येथील सातारा रोलबॉल असोसिएशन, युवा फायटर, डी. एस. जी. यातील विद्यार्थिनी या महाराष्ट्र संघात सुवर्णपदक मिळाले. मुला व मुलींच्यात सुवर्णपदक मिळविणारे प्रतिक राऊत, श्रीकांत कोळेकर, ईशिका सुर्यवंशी वे नेहा कुलकर्णी हे चारही विद्यार्थी सातारामधून होते. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सी. बी. एस. सी. व आसाम या दोन्ही संघाचा पराभव करून महाराष्ट्रला सुवर्णपदक मिळवून दिले.यावर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धा जगदपूर येथे पार पडल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने मध्यप्रदेश, गुजरात, बिहार आणि यजमान छत्तीसगड या सर्व संघांचा पराभव करून अंतिम फेरित प्रवेश केला. सी. बी. एस. सी. संघाबरोबर अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात महाराष्ट्र संघाने विजय मिळविला. या संघात साताऱ्यातील तीन जणांचा समावेश होता.छत्तीसगडचे शिक्षण व क्रीडा मंत्री गणेश कश्यम व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना सुवर्णपदक देण्यात आले. राष्ट्रीय स्पर्धेत त्यांना महाराष्ट्राचे संघ व्यवस्थापक रफिक इनामदार, प्रशिक्षण आनंद पाटेकर, पल्लवी शिंदे, नंदू पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व संघाला राजू दाभाडे, सचिव ज्ञानेश काळे व सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी व अन्य क्रीडा मार्गदर्शक यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)