द्राक्ष, आंबा निर्यातीत महाराष्ट्र देशात अव्वल; देशातून ५८ हजार कोटींची शेतमाल निर्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 08:26 AM2021-05-30T08:26:44+5:302021-05-30T08:27:01+5:30

देशातील शेतमाल परदेशात पाठवण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या स्वतंत्र यंत्रणेचा सर्वाधिक वापर महाराष्ट्राने केला. आतापर्यंत या यंत्रणेला राज्यातील ८० हजार शेतकरी कृषी विभागाने जोडले आहेत.

Maharashtra is the top exporter of grapes and mangoes in the country | द्राक्ष, आंबा निर्यातीत महाराष्ट्र देशात अव्वल; देशातून ५८ हजार कोटींची शेतमाल निर्यात

द्राक्ष, आंबा निर्यातीत महाराष्ट्र देशात अव्वल; देशातून ५८ हजार कोटींची शेतमाल निर्यात

Next

- राजू इनामदार

पुणे : कोरोनाकाळात म्हणजे  एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात भारतातून ५८ हजार ७६ कोटींची  फळफळाव व शेतमालाची निर्यात झाली. त्यामध्ये महाराष्ट्राचा १३ हजार ८७७ कोटींचा असून, द्राक्ष आणि आंबा निर्यातीत राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. 

देशातील शेतमाल परदेशात पाठवण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या स्वतंत्र यंत्रणेचा सर्वाधिक वापर महाराष्ट्राने केला. आतापर्यंत या यंत्रणेला राज्यातील ८० हजार शेतकरी कृषी विभागाने जोडले आहेत. राज्यानेही स्वतंत्र निर्यात कक्ष तयार केला आहे.  फळे व भाजीपाल्यांसाठी ४५ प्रकारच्या संगणकीय यंत्रणा तयार आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांना निर्यातक्षम माल तयार करण्यापासून ते परदेशी बाजारपेठ शोधण्यापर्यंत सर्व प्रकारची मदत केली जाते. या माध्यमातूनच कोरोनाकाळात राज्याने २ हजार २५० कोटींची द्राक्ष निर्यात केली. देशाची द्राक्षांची एकूण निर्यात २ हजार २९०  कोटी रुपयांची आहे. राज्याचा त्यातला वाटा ९८.२५ टक्के आहे. केळी आणि आंबा निर्यातीतही महाराष्ट्र आघाडीवर असून अनुक्रमे ४५५ व १९२ कोटींची निर्यात झाली आहे. देशात या दोन्ही फळांमध्ये राज्याचा वाटा अनुक्रमे ७३.८६ व ८९.७२ टक्के आहे.  निर्यात कक्षातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फळं व भाजीपाला निर्यातीत महाराष्ट्राला मोठा वाव आहे. 

द्राक्ष वगैरेसाठी प्लॉटची नोंदणी करून मागणी करणारे देश सांगतील त्याप्रमाणेच, त्याच औषधांची फवारणी करावी लागते. या सर्व गोष्टी शेतकऱ्यांनी सवयीच्या करून घेतल्या, तर महाराष्ट्राला शेतमाल निर्यातीत अजून भरपूर वाव आहे. आमचा तोच प्रयत्न आहे
-गोविंद हांडे, राज्य सल्लागार, निर्यात कक्ष

Web Title: Maharashtra is the top exporter of grapes and mangoes in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mangoआंबा