फार्मसी कॉलेजच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्र अव्वल

By admin | Published: April 4, 2017 01:08 AM2017-04-04T01:08:51+5:302017-04-04T01:08:51+5:30

नॅशनल इन्स्टिट्यूटशनल रॅकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या देशातील फार्मसी कॉलेजच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

Maharashtra top ranked in Pharmacy College Rankings | फार्मसी कॉलेजच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्र अव्वल

फार्मसी कॉलेजच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्र अव्वल

Next

पुणे : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे नॅशनल इन्स्टिट्यूटशनल रॅकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या देशातील फार्मसी कॉलेजच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. देशातील 50 महाविद्यालयांच्या मानांकनाच्या (रँकिंग) यादीत राज्यातील १७ महाविद्यालयांचा समावेश आहे. त्यातही पहिल्या १५ महाविद्यालयांमध्ये राज्यातील ३ फार्मसी महाविद्यालयांचा समावेश आहे.
एनआयआरएफतर्फे देशातील पहिल्या ५0 फार्मसी महाविद्यालयांची मानांकनाची यादी प्रसिद्ध करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापाठोपाठ राज्यातील फार्मसी महाविद्यालयांनी वरचे मानांकन मिळविले आहे. मुंबईतील इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी देशात चौथ्या, तर राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. पुण्यातील भारती विद्यापीठाचे पूना कॉलेज आॅफ फार्मसी देशात आठव्या आणि राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच मुंबईच्या बॉम्बे कॉलेज आॅफ फार्मसीने देशात पंधरावे आणि राज्यात तिसरे स्थान मिळवले आहे.
राज्यातील इतरही फार्मसी महाविद्यालयांनी देशपातळीवरील रँकिंगमध्ये स्थान मिळवले आहे. त्यात वाय. बी. चव्हाण कॉलेज आॅफ फार्मसी, औरंगाबाद (२४), के. एम. कुंडनानी कॉलेज आॅफ फार्मसी, मुंबई (२९), संजीवनी कॉलेज आॅफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, कोपरगाव (३२), किशोरीताई भोयर कॉलेज आॅफ फार्मसी, कामटी (३४), भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ फार्मसी, कोल्हापूर (३६), आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसी, शिरपूर (३८), पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट आॅफ फार्मस्युटिकल सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर (४0), प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कॉलेज आॅफ फार्मसी, पुणे (४१), डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज आॅफ फार्मसी, मुंबई (४२), नरसी मोनजी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई (४३), इन्स्टिट्यूट आॅफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, वर्धा (४५), एमव्हीपी समाजस् कॉलेज आॅफ फार्मसी, नाशिक (४७), गुरू नानक कॉलेज आॅफ फार्मसी, नागपूर (४९), आणि पुण्यातील एआयएसएसएमएस कॉलेज आॅफ फार्मसी देशात ५0व्या क्रमांकावर आहे.
>मॅनेजमेंटच्या यादीत पुण्याच्या दोन कॉलेजना स्थान
मॅनेजमेंट कॉलेजच्या मानांकन यादीत पुण्याच्या भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (४० वी रँक) व एमआयटी कॉलेज (४७ रँक) या दोन महाविद्यालयांना स्थान मिळाले आहे. देशभरातून ५० मॅनेजमेंट कॉलेजना मानांकन देण्यात आले आहे. राज्यातून ७ महाविद्यालयांना मानांकन मिळाले. पुण्याच्या दोन तर मुंबईच्या ५ महाविद्यालयांना मानांकन मिळाले.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाला ६१ वे मानांकन मिळाले. देशभरातील ७५० विद्यापीठांमधून ६१ मानांकन मिळाल्याचा आनंद आहे. मात्र पहिल्या ५० विद्यापीठांमध्ये स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. पुढील वर्षी सुधारणा करू.
- विद्या येरवडेकर, प्रधान संचालिका, सिम्बायोसिस.
>पुण्याचे ४ इंजिनिअरिंग कॉलेज पहिल्या शंभरात
उपग्रह तयार करून तो अंतराळ पाठविल्यामुळे चर्चेत आलेल्या सीओईपी कॉलेजने देशात २४ वे मानांकन मिळविले आहे. देशातील पहिल्या शंभर महाविद्यालयांमध्ये राज्यातील ५ महाविद्यालयांना स्थान मिळाले आहे, त्यापैकी ४ महाविद्यालये ही पुण्याची आहेत.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी विद्यापीठे व महाविद्यालयांचे मानांकन जाहीर केले. सीओपीई, पुणे (२४), विश्वेश्वर नॅशनल इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी, नागपूर (४२), भारती विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेज (६६), आर्मी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (७७), महाराष्ट्र इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, पुणे (९४) या अभियांत्रिकी महाविद्यालयांना पहिल्या १०० मध्ये स्थान मिळाले आहे.
शिक्षण (टीचिंग लर्निंग), संशोधन (रिसर्च), शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळणारी नोकरीची संधी (ग्रॅज्युएट आउटकम), सर्वसमावेशकता (आउटरिच इनक्लिब्लिटी), लोकांचे मत (परसेप्शन) या निकषांच्या आधारे अभियांत्रिकी महाविद्यालयांचे मूल्यांकन करून त्यांना मानांकन देण्यात आले आहे. सीओईपीला टीचिंग लर्निंगमध्ये ७०.५६, रिसर्चमध्ये २४.४७, नोकरीच्या संधीमध्ये ७०.०९, सर्वसमावेशकतेमध्ये ६९.८१, परसेप्शनमध्ये २६.३३ असे एकूण ५२.१४ गुण मिळाले.

Web Title: Maharashtra top ranked in Pharmacy College Rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.