थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 06:57 AM2024-06-01T06:57:30+5:302024-06-01T06:59:49+5:30
महाराष्ट्राने या बाबतीत स्वत:चाच विक्रम माेडला, पाहा काेणत्या राज्यात किती गुंतवणूक?
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उद्योगांमधील थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी देशात क्रमांक एकवर असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या हवाल्याने दिली. बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली. १.१८ लाख कोटींच्या परकीय गुंतवणुकीसह महाराष्ट्र २०२२-२३ मध्ये अव्वल होता. राज्याने २०२३-२४ मध्ये १.२४ लाख कोटींची परकीय गुंतवणूक आकर्षित करत स्वत:चाच उच्चांक मोडला.
काेणत्या राज्यात किती गुंतवणूक?
- राज्य २०२१-२२ २०२२-२३ २०२३-२४
- महाराष्ट्र १,१४,९६४ १,१८,४२२ १,२५,१०१
- कर्नाटक १,६३,७९५ ८३,६२८ ५४,४२७
- गुजरात २०,१६९ ३७,०५९ ६०,६००
- दिल्ली ६०,८३९ ६०,११९ ५३,९८०
- तामिळनाडू २२,३९६ १७,२४७ २०,१५७
- हरयाणा २०,९७१ २०,७३५ १५,७९७
- तेलंगणा ११,९६४ १०,३१९ २५,०९४
- राजस्थान ५,२७७ ७,२१८ २,१९५
- उत्तर प्रदेश १,६१९ ३,३७३ २,७६२